शरीर निरोगी राखण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. रोजच्या धावपळीत आपण अनेकदा आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेत नाही, ज्यामुळे शरीराच्या विविध तक्रारी सुरु होतात. व्यायाम आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो हे आपल्या सर्वांना माहीत असतं पण व्यायाम कधी केल्यानं त्याचा परिणाम सर्वाधिक जाणवतो यावर नुकतंच एक संशोधन करण्यात आलं.
अलीकडच्या एका संशोधनातून याबाबतचा एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. या संशोधनानुसार, सकाळी व्यायाम केल्यानं तुमच्या हृदयाचं आरोग्य सुधारू शकतं आणि वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
advertisement
अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या एका अहवालानुसार, व्यायामाच्या वेळेचा तुमच्या परिणामांवर परिणाम होऊ शकतो. मॅसॅच्युसेट्स चॅन मेडिकल स्कूलमधील संशोधक प्रेम पटेल आणि त्यांच्या टीमनं जवळपास 14,000 जणांवचा वर्षभर अभ्यास केला. त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी परिधान करण्यायोग्य उपकरणांचा वापर करण्यात आला.
जे लोक सकाळी व्यायाम करतात त्यांना हृदयविकार आणि चयापचय समस्यांचा धोका लक्षणीयरीत्या कमी असतो असं या अभ्यासात आढळून आलं.
सकाळी सात ते आठ ही त्यासाठीची 'सुवर्ण वेळ' म्हणजेच गोल्डन अवर असतो. सकाळी सात ते आठ या वेळेत व्यायाम करणं सर्वात फायदेशीर ठरतं असा या अभ्यासातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष होता. या एका तासातील शारीरिक हालचालींमुळे हृदयविकाराचा धोका सर्वात कमी पातळीवर येतो.
सकाळच्या व्यायामाचे फायदे समजून घेऊया -
वजन कमी होणं - इतर व्यायामांच्या तुलनेत, सकाळच्या व्यायामामुळे वजन वाढण्याचा आणि लठ्ठपणाचा धोका 35% नी कमी होतो असं आढळून आलं आहे.
हृदयविकार - हृदयविकाराचा झटका आणि रक्तवाहिनीतील अडथळा यांसारख्या आजारांचा धोका 31% नी कमी होतो.
मधुमेह प्रतिबंध - टाईप 2 मधुमेहाचा धोका 30% नं कमी होतो.
कोलेस्ट्रॉल नियंत्रण - शरीरातील उच्च कोलेस्ट्रॉलचा (हायपरलिपिडेमिया) धोका 21% नं कमी होतो.
रक्तदाब - उच्च रक्तदाबाचा धोका 18% नं कमी होतो.
शास्त्रज्ञांनी याची काही प्रमुख कारणं सांगितली आहेत:
सर्केडियन रिदम्स - जैविक घड्याळ
सकाळी, शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता जास्त असते आणि कॉर्टिसोलची पातळीही जास्त असते. या वेळी व्यायाम करणं आपल्या शारीरिक रचनेला आणि जैविक प्रक्रियांना अगदी अनुकूल असतं.
Health Tips : खूप तास एका जागी बसण्यानं होईल मोठं नुकसान, दीर्घकाळ बसण्याचे धोके ओळखा, सतर्क व्हा
फॅट बर्निंग - चरबी जाळण्याची प्रक्रिया
बहुतेक जण सकाळी उपाशीपोटी व्यायाम करतात. शरीराला ऊर्जेसाठी नुकत्याच खाल्लेल्या अन्नातून कर्बोदकं मिळत नसल्यामुळे, ते साठलेली चरबी जाळायला सुरुवात करतं. यामुळे वजन लवकर कमी होतं.
नित्यक्रमातील सातत्य - संध्याकाळच्या वेळी अनेकदा व्यायाम चुकतो. पण सकाळची वेळ तुमची असते. एकदा तुम्हाला लवकर उठण्याची सवय लागली की, व्यायाम चुकण्याची शक्यता खूप कमी होते.
संध्याकाळी व्यायाम करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे असं अनेकांना वाटू शकतं पण यावरही संशोधनात विचार करण्यात आलाय. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणं चांगलं. जीवनशैलीमुळे तुम्हाला सकाळी सात ते आठ या वेळेत व्यायाम करणं शक्य होत नसेल, तर दुपारी किंवा संध्याकाळी व्यायाम करणं देखील तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं.
