हनुमान जयंतीला न चुकता करा 'हे' खास उपाय, पिडा होईल दूर; सर्व इच्छा होतील पूर्ण!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
गुरुवारी देशभरात 'हनुमान जयंती' मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर संकटमोचन हनुमानाचा जन्म झाला होता. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी केलेले काही विशेष उपाय केवळ संकटांपासून मुक्ती देत नाहीत, तर शनी आणि मंगळ ग्रहांचे अशुभ प्रभावही दूर करतात.
advertisement
1/7

गुरुवारी देशभरात 'हनुमान जयंती' मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर संकटमोचन हनुमानाचा जन्म झाला होता. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी केलेले काही विशेष उपाय केवळ संकटांपासून मुक्ती देत नाहीत, तर शनी आणि मंगळ ग्रहांचे अशुभ प्रभावही दूर करतात.
advertisement
2/7
हनुमान चालीसा आणि बजरंग बाण पठण: जर तुम्ही कोणत्याही मोठ्या संकटात असाल किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल, तर हनुमान जयंतीपासून सलग 11 दिवस दररोज 11 वेळा हनुमान चालीसा पठण करा. अकराव्या दिवशी 'बजरंग बाण' या स्तोत्राचे पठण केल्याने हनुमंत स्वतः तुमच्या मदतीला धावून येतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे.
advertisement
3/7
शनी आणि मंगळ दोषावर उपाय: ज्यांच्या कुंडलीत शनीची साडेसाती किंवा मंगळ दोष आहे, त्यांनी या दिवशी मारुतीला सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे. तसेच, हनुमान जयंतीला तुळशीचे रोप दान केल्याने शनी, राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि घरात शांती नांदते.
advertisement
4/7
पिंपळाच्या पानांचा उपाय: आर्थिक चणचण दूर करण्यासाठी हनुमान जयंतीला 11 पिंपळाची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यावर केशराने 'श्री राम' लिहून त्याची माळ तयार करा आणि ती हनुमानाला अर्पण करा. हा उपाय केल्याने कर्जातून मुक्ती मिळते आणि पैशांची आवक वाढते.
advertisement
5/7
बुंदीचा प्रसाद आणि सिंदूर लेपन: हनुमानाला बुंदीचे लाडू किंवा बुंदी अत्यंत प्रिय आहे. या दिवशी गरीब मुलांना बुंदीचा प्रसाद वाटल्याने मारुतीराया प्रसन्न होतात. तसेच, मारुतीच्या अंगाला सिंदूर लावल्याने अपघाताचा धोका टळतो आणि आरोग्य उत्तम राहते.
advertisement
6/7
तुळशीची माळ आणि नैवेद्य: हनुमानाला नैवेद्य दाखवताना त्यात तुळशीचे पान ठेवणे अनिवार्य आहे, कारण तुळशीशिवाय मारुती नैवेद्य स्वीकारत नाहीत. प्रभू श्रीरामांचे नाव घेत हनुमानाला तुळशीची माळ अर्पण केल्याने मानसिक शांतता लाभते आणि भीती दूर होते.
advertisement
7/7
शुभ मुहूर्तावर पूजा: 2 एप्रिल 2026 रोजी पहाटे 06:10 ते 07:44 हा पूजेसाठी सर्वोत्तम मुहूर्त आहे. या काळात सूर्योदयाच्या वेळी हनुमानाची आरती आणि मंत्रजप केल्याने वर्षभर हनुमानजींचे संरक्षण कवच तुमच्या पाठीशी राहते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
हनुमान जयंतीला न चुकता करा 'हे' खास उपाय, पिडा होईल दूर; सर्व इच्छा होतील पूर्ण!