समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सुरेंद्र पाटीलच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात 3 देशी बनावटीच्या पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॅालवर, 7 गावठी कट्टे, 2 एअर गन, 405 जिवंत काडतुसे, जिवंत 167 छर्रे, 2 तलवार, 3 लोखंडी कोयते, 1 सुरा, 2 चाकू, लोखंडी रॅाड, आणि 3 लाख 20 हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. रिल स्टार सुरेंद्र पाटीलावर तब्बल 12 पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. डोंबिवली मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये पोलिस अधिका-यांच्या खुर्चीवर बसून सुरेंद्रने रील बनवली होती. तर एका मुलीच्या विनयभंगाचा गुन्हा देखील सुरेंद्रवर दाखल आहे.
advertisement
एवढा मोठा साठा नेमका कशासाठी आणला होता?
महत्त्वाचे म्हणजे सुरेंद्रने शस्त्रसाठी लपवण्यासाठी चपलांच्या स्टँडसाठी एक गुप्त कप्पा तयार केला होता. हा कप्पा अशा पद्धचतीने बनवसा होता की, कोणालाही संशय येऊ नये याची खबरदारी पूर्णपणे घेतली होती. चप्पल स्टँडच्या कप्प्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने हा शस्त्रसाठी नेमका कोणाचा होता? काही मोठा कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच हा साठा वैयक्तित होतातर एवढा मोठा साठा नेमका कशासाठी आणला होता? कोणाकडून आणला होता? यामागे कोणत्या बड्या व्यक्तीचा हाच होता का याचा पोलीस तपास करत आहे.
पोलिसांकडून लवकरच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
सुरेंद्र पाटील याआधीही वादग्रस्त रील्समुळे चर्चेत आला होता. त्याच्या सोशल मीडियावरील अॅक्टिव्हिटीमुळे अनेकदा वाद निर्माण झाले होते. आता या कारवाईनंतर त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असून, पोलिसांकडून लवकरच आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
