TRENDING:

कधी होती TV सोशिक सून, आता थेट खलनायिका बनून दाखवणार इंगा; फेमस अभिनेत्रीची 'आनंदी'मध्ये एन्ट्री

Last Updated:
नुकत्याच सुरू झालेल्या आनंदी मालिकेत फेमस अभिनेत्री दिसणार आहे. कधी टीव्हीची सोशिक सून साकारणारी ही अभिनेत्री थेट खलनायिका बनली आहे.
advertisement
1/10
कधी होती TV सोशिक सून, आता थेट खलनायिका बनून दाखवणार इंगा; फेमस अभिनेत्रीची 'आनंदी'मध्ये एन्ट्री
स्टार प्रवाहवर नुकतीच सुरू झालेली 'आनंदी' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रेक्षकांकडून होत असलेल्या कौतुकाच्या वर्षावात आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे.
advertisement
2/10
कथेला नवं वळण देणारी शलाका ही व्यक्तिरेखा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.ही महत्त्वाची भूमिका टीव्हीची एक प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार आहे.
advertisement
3/10
ही अभिनेत्री कधी स्टार प्रवाहच्या फेमस मालिकेत एका सोशिक सुनेच्या भूमिकेत दिसली होती. आता ती थेट खलनायिका बनून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
advertisement
4/10
या अभिनेत्रीनं केवळ मराठी मालिकाच नाही तर अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. तिच्या अभिनयानं तिनं प्रेक्षकांनी मनं जिंकत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
advertisement
5/10
ही अभिनेत्री आहे सई रानडे. आनंदी या मालिकेत अभिनेत्रीची एन्ट्री खास ठरणार आहे. शलाका असं सईच्या पात्राचं नाव आहे. या पात्राच्या एन्ट्रीमुळे मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
advertisement
6/10
शलाका ही प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची मेहुणी. युगंधरची दिवंगत पत्नी समिधा आणि तिची बहिण शलाका या जुळ्या बहिणी मात्र दोघींचेही स्वभाव पूर्णत: भिन्न.
advertisement
7/10
समिधा जेवढी सालस, शांत आणि सर्वांना आपलसं करून घेणारी तेवढीच शलाका उथळ,स्वतःच्या रूपाचा आणि पैशाचा अभिमान मिरवणारी.
advertisement
8/10
युगंधरने शलाकाची निवड न करता समिधाची पत्नी म्हणून निवड केली याची सल शलाका मनात बाळगून आहे. युगंधरला नेस्तनाबूत करणं हाच तिच्या आयुष्याचा उद्देश आहे. याचसाठी पैशाच्या जोरावर शलाकाने सुद्धा गार्मेंट व्यवसायात आपलं साम्राज्य उभं केलंय. जोवर युगंधर संपत नाही तोवर अंगावर कुठलाच रंग चढवणार नाही हे शलाकाने ठरवलं आहे. म्हणूनच ती फक्त काळया रंगाचे कपडे वापरते.
advertisement
9/10
शलाकाच्या आगमनानंतर 'आनंदी' मालिकेतील नातेसंबंध, संघर्ष आणि नाट्य अधिक तीव्र होणार आहे. आता शलाका आणि युगंधर यांच्यातील संघर्ष कसा रंगतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. रात्री 9.:30 वाजता आनंदी ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर टेलिकास्ट होते.
advertisement
10/10
अभिनेत्री सई रानडे स्टार प्रवाहच्या देवयानी मालिकेत दिसली. या मालिकेत तिनं देवयानी सोशिक जाऊबाईंची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना आवडली होती. अभिनेत्री सई रानडे गेली अनेक वर्ष हिंदी मालिकेतही सक्रीय आहे. बरसाते, रुंजी सारख्या अनेक मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
कधी होती TV सोशिक सून, आता थेट खलनायिका बनून दाखवणार इंगा; फेमस अभिनेत्रीची 'आनंदी'मध्ये एन्ट्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल