यातील सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम म्हणजे स्कॉट्स. ज्याला आपण साध्या भाषेत 'उठबशा' म्हणतो. जर तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर फक्त 20 स्कॉट्स मारायचे ठरवले, तर तुमच्या शरीरात असे काही बदल होतील जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. चला तर मग, या साध्या वाटणाऱ्या व्यायामाचे वैज्ञानिक फायदे समजून घेऊया.
1. खालच्या शरीराचे स्नायू होतील लोखंडासारखे मजबूत
advertisement
स्कॉट्स हा एक कंपाऊंड एक्सरसाइजआहे, म्हणजेच तो एकाच वेळी अनेक स्नायूंवर काम करतो. 20 स्कॉट्समुळे तुमच्या मांड्या, हिप्स आणि पायांचे स्नायू अत्यंत मजबूत होतात. यामुळे चालताना किंवा पायऱ्या चढताना तुम्हाला कधीही थकवा जाणवणार नाही.
2. कोअर मसल्स आणि पोटाचा घेर कमी होण्यास मदत
अनेकांना वाटतं की स्कॉट्स फक्त पायांसाठी आहेत, पण तसं नाही. स्कॉट्स मारताना संतुलन राखण्यासाठी तुम्हाला तुमचे पोटाचे स्नायू घट्ट ठेवावे लागतात. दररोज 20 स्कॉट्स मारल्याने पोटाचे स्नायू टोन होतात आणि पोटाचा वाढलेला घेर कमी होण्यास नैसर्गिक मदत मिळते.
3. हाडांची घनता वाढते आणि सांधेदुखीपासून सुटका
वाढत्या वयात हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते. दररोज सकाळी 20 स्कॉट्स मारल्याने हाडांची घनता सुधारते. हे गुडघे आणि घोट्यांच्या सांध्यांची लवचिकता वाढवते, ज्यामुळे भविष्यात होणारी सांधेदुखी किंवा दुखापतीची जोखीम कमी होते.
4. रक्ताभिसरण आणि पचनक्रिया सुधारते
जेव्हा तुम्ही स्कॉट्स मारता, तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात आणि संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण वेगाने होते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. शिवाय, या व्यायामामुळे आतड्यांची हालचाल सुधारते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊन पचनक्रिया सुरळीत होते.
5. टेस्टोस्टेरॉन आणि ग्रोथ हार्मोन्समध्ये वाढ
पुरुषांसाठी स्कॉट्स अत्यंत फायदेशीर आहेत. हा व्यायाम केल्याने शरीरात नैसर्गिकरीत्या टेस्टोस्टेरॉन आणि ग्रोथ हार्मोन्सची पातळी वाढते. यामुळे केवळ स्नायूंची वाढ होत नाही, तर तुमची दिवसभराची उर्जा टिकून राहण्यास मदत होते.
योग्य पद्धत कोणती?
20 स्कॉट्स मारणे सोपे असले तरी ते 'योग्य फॉर्म'मध्ये करणे महत्त्वाचे आहे:
पाय खांद्याच्या रेषेत ठेवा.
खाली बसताना तुमची पाठ ताठ असावी.
तुमचे गुडघे पायाच्या अंगठ्याच्या पुढे जाऊ नयेत.
श्वास घेत खाली जा आणि श्वास सोडत वर या.
सकाळी उठल्यावर सोशल मीडिया तपासण्यापेक्षा फक्त 2 मिनिटे काढून 20 स्कॉट्स मारणे, ही तुमच्या आरोग्यासाठी केलेली सर्वात मोठी गुंतवणूक ठरू शकते. यामुळे तुमचे शरीर केवळ बाहेरूनच नाही, तर आतूनही मजबूत होईल.
