TRENDING:

राज्यातील 39 नेत्यांनी करंगळ्या कापून घेतल्या? खरातच्या पुजेला कोणकोण भुललं? नव्या दाव्याने राज्यात खळबळ

Last Updated:

नवनवीन पूजा सांगून दोष निवारण करण्याचा दावा अशोक खरीत संबंधितांकडे करीत असे. पुजेचा भाग म्हणून खरात अनेकांना करंगळी, अनामिका कापून रक्त वाहण्यास सांगत होता, असे आरोप झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरला आहे. राजकीय नेते, दिग्गज मंत्री, अनेक सनदी अधिकारी, नावाजलेले पोलीस अधिकारी, डॉक्टर, निष्णात वकील, व्यावसायिक आदी मंडळींना अशोक खरात याने आपली भुरळ पाडली होती. नवनवीन पूजा सांगून दोष निवारण करण्याचा दावा अशोक खरीत संबंधितांकडे करीत असे. पुजेचा भाग म्हणून खरात अनेकांना करंगळी, अनामिका कापून रक्त वाहण्यास सांगत होता, असे आरोप झाल्यानंतर शेतकरी नेते अजित नवले यांनीही अशाच पद्धतीचा आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
सुनील तटकरे-रुपाली चाकणकर-अशोक खरात
सुनील तटकरे-रुपाली चाकणकर-अशोक खरात
advertisement

शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि समविचारी पक्षांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कॉम्रेड अजित नवले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यात गाजत असलेले अशोक खरात प्रकरण, शेतकरी कर्जमाफी अशा प्रश्नांवर अजित नवले यांनी रोखठोक भूमिका मांडली.

राज्यातील 39 नेत्यांनी करंगळ्या कापून घेतल्या?

रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांनी अनामिका कापल्याचा आरोप झाला. अशोक खरात याच्या सांगण्यावरून त्यांनी सोमवती अमावस्येला अनामिका कापून रक्त वाहिल्याच्या आरोपांनी महाराष्ट्र हादरून गेला. बसता उठता पुरोगामी महाराष्ट्र असे पालुपद लावणारे नेते त्याच महाराष्ट्रात पुजेच्या नावाखाली अनामिका कापत असल्याच्या आरोपांनी अनेकांना विचार करायला भाग पाडले. आता शेतकरी नेते अजित नवले यांनी नवा दावा केला आहे. राज्यातील ३९ नेतेमंडळी तथा लोकप्रतिनिधींनी अशोक खरात याच्या सांगण्यावरून करंगळी-अनामिका कापली असा दावा नवले यांनी केला आहे.

advertisement

त्या नेत्यांचे राजीनामे घेतले पाहिजे, आम्ही मोर्चा काढणार

मंत्री म्हणून शपथ घेताना वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार आणि प्रसार करेन, असे नेते मंडळी सांगतात. पण याच शपथेचा अनेकांनी भंग केला आहे. या सगळ्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. अनेक लोकप्रतिनिधी अशोक खरात याच्याकडे नियमितपणे येत असत. त्यांचे खरातसोबत नेहमी उठणे बसणे होत असे. या सगळ्या लोकप्रतिनिधींचे राजीनामे घेतले पाहिजेत, अशी मागणी करून 6 एप्रिल रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्यभरात मोर्चा काढून आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा कॉम्रेड अजित नवले यांनी केली.

advertisement

अशोक खरात याचे राजकीय कनेक्शन

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Agriculture Tips: शेतीला कीड-रोगांचा धोका, उन्हाळ्यात कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video
सर्व पहा

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याचे हायप्रोफाईल राजकारणी, बडे अधिकारी, उद्योजक आणि कलाकार यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध समोर आले आहेत, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खरात याच्या संपर्कात अनेक क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्ती होत्या. यामध्ये राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, शासकीय अधिकारी, पोलीस, व्यावसायिक यांचा समावेश असल्याचे बोलले जाते.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यातील 39 नेत्यांनी करंगळ्या कापून घेतल्या? खरातच्या पुजेला कोणकोण भुललं? नव्या दाव्याने राज्यात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल