भारत-पाकिस्तान नात्यावर आलेली फिल्म, ठरलेली सर्वात मोठी ब्लॉकबस्टर; कमावलेले तब्बल 918 कोटी, कुठे पाहाल?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
धुरंधर च्या दोन्ही भागांनी १००० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. अशातच २०१५ साली म्हणजेच तब्बल ११ वर्षांआधी रिलीज झालेल्या या फिल्मने ९१८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
advertisement
1/7

सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त एक नाव गाजतंय, ते म्हणजे धुरंधर २. आतापर्यंत या फिल्मने जगभरात १४०० कोटींहून अधिक गल्ला केला असून देशात तिने १००० कोटी पार केले आहेत. भारत-पाकिस्तान हा विषय असा आहे, जो कधीच जुना होणार नाही. या दोन देशांमधील शत्रूत्व आणि त्यातील वाद दाखवणारे अनेक सिनेमे आजवर रिलीज झाले आहेत. अशातच एक फिल्म आली होती, ज्याने लढाई नाही, तर माणूसकीच्या भाषेने या दोन्ही देशातील प्रेक्षकांना रडवलं.
advertisement
2/7
धुरंधर च्या दोन्ही भागांनी १००० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. अशातच २०१५ साली म्हणजेच तब्बल ११ वर्षांआधी रिलीज झालेल्या या फिल्मने ९१८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ही फिल्म आहे बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आजवरचा सर्वात इमोशनल आणि सुपरहिट ठरलेला 'बजरंगी भाईजान'.
advertisement
3/7
दिग्दर्शक कबीर खान यांनी मांडलेली ही कथा केवळ भारतातच नाही, तर पाकिस्तानातही हिट ठरली. ही गोष्ट आहे एका सरळमार्गी, हनुमान भक्त पवन कुमार चतुर्वेदी ऊर्फ 'बजरंगी'ची आहे. जेव्हा त्याला पाकिस्तानची एक मुकी-बहिरी मुन्नी भारतात हरवलेली सापडते, तेव्हा तो तिला कोणत्याही परिस्थितीत तिच्या घरी पोहोचवण्याचा निश्चय करतो.
advertisement
4/7
विशेष म्हणजे, या फिल्ममध्ये कोणताही व्हिलन नाही. कोणताही पासपोर्ट किंवा व्हिसा नसताना केवळ सत्याच्या आणि विश्वासाच्या जोरावर पाकिस्तानात घुसून 'जय श्री राम'चा नारा देणारा बजरंगी, भारतीय सिनेमातील सर्वात धाडसी पात्रांपैकी एक ठरला.
advertisement
5/7
जेव्हा ही फिल्म रिलीज झाले, तेव्हा तिने बॉलिवूडचे अनेक जुने रेकॉर्ड्स मोडून काढले होते. भारतात ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणाऱ्या या सिनेमाने जगभरात ९१८ कोटींची कमाई केली. इतकंच नाही, तर चीनमध्ये रिलीज झाल्यानंतर, तिथल्या लोकांनी या फिल्मला डोक्यावर घेतलं.
advertisement
6/7
बजरंगी भाईजान या फिल्ममध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारलेला 'चाँद नवाब' आणि चिमुकल्या हर्षाली मल्होत्राची निरागसता यांनी प्रेक्षकांच्या हृदयात वेगळं स्थान मिळवलं. त्याचबरोबर करीना कपूरही या फिल्ममध्ये मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान, ही फिल्म सलमान खानच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली आहे.
advertisement
7/7
आजच्या काळात अनेक अॅक्शन फिल्म्सकडे प्रेक्षकांचा ओढा वाढत असतानाच 'बजरंगी भाईजान'ने आपल्या साधेपणाने प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणलं. जर तुम्हाला ही फिल्म पुन्हा पाहायची असेल तर तुम्ही ती हॉटस्टारवर पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भारत-पाकिस्तान नात्यावर आलेली फिल्म, ठरलेली सर्वात मोठी ब्लॉकबस्टर; कमावलेले तब्बल 918 कोटी, कुठे पाहाल?