TRENDING:

उन्हाळ्यात मोबाईल करेल घात, शरिरावर होतो असा परिणाम, एकदा वाचाच!

Last Updated:
मोबाईल जास्त बघितल्याने डोळे खराब होतात हे माहिती आहेच. पण हाच मोबाईल जास्त प्रमाणात बघितल्यास रोजच्या जगण्यावरही परिणाम होतो. त्यातच सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात अनेकजण घराबाहेर न पडता घरातच मोबाईल पाहत असतात.
advertisement
1/5
उन्हाळ्यात मोबाईल करेल घात, शरिरावर होतो असा परिणाम, एकदा वाचाच!
मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. त्यामुळे अनेक जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. जास्तीत जास्त वेळ हा स्क्रीन बघण्यामध्ये घालवला जातो. मोबाईल जास्त बघितल्याने डोळे खराब होतात हे माहिती आहेच. पण हाच मोबाईल जास्त प्रमाणात बघितल्यास रोजच्या जगण्यावरही परिणाम होतो. त्यातच सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्यात अनेकजण घराबाहेर न पडता घरातच मोबाईल पाहत असतात.
advertisement
2/5
याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. त्याबाबत कशी काळजी घ्यावी? याबद्दलच पुण्यातील डॉक्टर सचिन पवार यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/5
डॉ. सचिन पवार सांगतात की, आपण पाहतो की अनेक लोक हे तणाव कमी करण्यासाठी मोबाईल बघत असतात. पण इंटरनेटवर काहीतरी वाचणे, बराच वेळ फोन वापरणे, झोप न लागणे अशा कारणांमुळेही फोनचा ताण येऊ शकतो. त्यामुळे मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येतात. यामुळे डोळे दुखणे, झोपेचे विकार होतात. तर मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. तसेच यामुळे डोकेदुखीचाही त्रास होऊ शकतो.
advertisement
4/5
आपला मोबाईल हा आधीच गरम असतो आणि बाहेरची उष्णता यामुळे शरीरातील उष्णता वाढते. यामुळे अशक्तपणा सनस्ट्रोकही होण्याची शक्यता असते. तसेच उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होते. म्हणून डोळ्याला ड्रायनेस, इरिटेशन आणि दृष्टीची समस्या निर्माण होतात.
advertisement
5/5
जास्तीत जास्त पाणी प्यावे. मोकळ्या हवेत फिरावे. तसेच एसी, फॅन, कुलर असणाऱ्या जागेत बसणे. यासोबतच शक्य होईल तितका मोबाईलचा अतिवापर करणे टाळावे, असा सल्लाही डॉ. सचिन पवार यांनी दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात मोबाईल करेल घात, शरिरावर होतो असा परिणाम, एकदा वाचाच!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल