TRENDING:

Cricket Story : 6 बॅले डान्सरना घेऊन रूममध्ये पोहोचला सचिन तेंडुलकर, टीम इंडियाच्या मॅनेजरची उडाली होती झोप!

Last Updated:

24 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये सचिन तेंडुलकर कधीच वादात सापडला नाही, पण मैदानाबाहेर मात्र सचिन कायमच खोडकर होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याने त्याच्या करिअरमधले जवळपाच सगळेच विक्रम स्वत:च्या नावावर केले. 24 वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये सचिन कधीच वादात सापडला नाही, पण मैदानाबाहेर मात्र सचिन कायमच खोडकर होता. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि टीम मॅनेजर अजित वाडेकर यांनी सचिनच्या खोड्यांचा किस्सा सांगितला होता.
6 बॅले डान्सरना घेऊन रूममध्ये पोहोचला सचिन तेंडुलकर, टीम इंडियाच्या मॅनेजरची उडाली होती झोप!
6 बॅले डान्सरना घेऊन रूममध्ये पोहोचला सचिन तेंडुलकर, टीम इंडियाच्या मॅनेजरची उडाली होती झोप!
advertisement

अजित वाडेकर यांचा 1 एप्रिलला वाढदिवस असतो, 1994 साली वाडेकर टीम इंडियाचे मॅनेजर असताना भारतीय टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होती. वाडेकरांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त 6 बेली डान्सरना बोलावलं होतं. खुद्द अजित वाडेकर यांनी क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या एका कार्यक्रमादरम्यान सचिन तेंडुलकरचा किस्सा सांगितला.

रात्री 12 वाजता सचिन हॉटेल रूममध्ये

'न्यूझीलंडमधली ही घटना आहे, 1 एप्रिलला माझा वाढदिवस होता. आदल्या दिवशी आमचा सराव छान झाला होता आणि आम्ही लवकर झोपायला गेलो, कारण मला ऑल फूल्स डे ला इतरांना फसवण्याची सवय होती. मी अर्धवट झोपेत होतो, तेव्हा मध्यरात्री बरोबर 12 वाजता सचिन गंभीर चेहऱ्याने माझ्या खोलीच्या दारावर उभा होता,' असं वाडेकर म्हणाले.

advertisement

'मी सचिनला विचारलं, अशा विचित्र वेळी माझ्या दारावर का आला आहेस? तेव्हा त्याने कपिल देवला काहीतरी झालं आहे, असं मला सांगितलं. मी पँट घालून दोन मजले दूर असलेल्या कपिलच्या खोलीमध्ये गेलो. जेव्हा आम्ही खोलीमध्ये शिरलो तेव्हा संपूर्ण टीम केक आणि शॅम्पेनच्या बॉटलसोबत होती. मला धक्का बसला आणि आश्चर्य वाटले', अशी प्रतिक्रिया अजित वाडेकर यांनी दिली.

advertisement

बॅले डान्सर नाचायला लागल्या

'अचानक बाजूच्या खोलीतून सहा बॅले डान्सर्स आत आल्या आणि नाचू लागल्या. मला वाटतं ही सचिनचीच आयडिया असावी, कारण सुनिल गावसकर त्या दौऱ्यावर कॉमेंटेटर होता, पण कुठेच दिसत नव्हता. सनी त्याच्या खोड्यांसाठी प्रसिद्ध आहे, पण ही नक्कीच सचिनची कल्पना असावी', असा किस्सा अजित वाडेकर यांनी सांगितला.

'मी बेली डान्सिंगचा खूप आनंद घेतला आणि शॅम्पेनचे दोन ग्लास प्यायलो, पण नंतर माझ्या लक्षात आलं की सगळेजण निघून जाऊ लागले होते. माझ्यासोबत फक्त एकच बेली डान्सर उरली होती. टीम मॅनेजर असल्यामुळे मला आचारसंहितेचे पालन करून माझ्या खोली परत जावं लागलं', असं वाडेकर म्हणाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाचे दर घसरले, कांद्याला भाव वाढ नाहीच, केळीची काय स्थिती?
सर्व पहा

'आम्ही श्रीलंकेत खेळत होतो, तो रोज वेगवेगळ्या कल्पना सुचवायचा. टीम बैठकीनंतर तो माझ्या खोलीमध्ये येऊन जेवण करायचा, जेणेकरून त्याला त्याचे पैसे द्यावे लागणार नाहीत', असा किस्साही अजित वाडेकर यांनी सांगितला.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Cricket Story : 6 बॅले डान्सरना घेऊन रूममध्ये पोहोचला सचिन तेंडुलकर, टीम इंडियाच्या मॅनेजरची उडाली होती झोप!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल