TRENDING:

धारावीच्या झोपडपट्टीत बालपण, पैशांपायी सोडली शाळा; अभिनेता आज 225 कोटींच्या संपत्तीचा मालक

Last Updated:
बॉलिवूडचा अभिनेता ज्याचं बालपण धारावीच्या झोपडपट्टीत गेलं. आज तो कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे.
advertisement
1/11
धारावीच्या झोपडपट्टीत बालपण, पैशांपायी सोडली शाळा; अभिनेता आज 225 कोटींच्या संपत्तीचा मालक
आपल्या उत्कृष्ट विनोदी टायमिंग, अनोखी शैली आणि अविस्मरणीय पात्रांमुळे त्यांनी बॉलिवूडमध्ये अशी छाप सोडली, ज्याची बरोबरी आजही कोणीही करू शकलेले नाही. 90 आणि 2000 च्या दशकातील प्रेक्षकांसाठी हा अभिनेता म्हणजे हे विनोदाचे समानार्थी नाव होतं.
advertisement
2/11
या अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. 90 च्या दशकातील या महान कलाकाराच्या आयुष्यातील काही अज्ञात पैलूंची ओळख करून देणार आहोत.
advertisement
3/11
ही कहाणी केवळ अभिनेत्याच्या यशाची नाही तर कठीण परिस्थितीतही कधीही हार न मानण्याऱ्या एका मुलाची, बापाची आहे.
advertisement
4/11
आपण बोलत आहेत अभिनेते, कॉमेडियन जॉनी लिव्हर यांच्याविषयी. त्यांचं खर नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे. त्यांचा जन्म मुंबईतील एका तेलगू ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचं बालपणी धावारीच्या झोपडपट्टीत देलं. लहानपणी अनेक अडचणींचा सामना केला पण जॉनी यांनी कधीही हार मानली नाही. स्वतःच्या हिमतीवर कोट्यवधी रुपयांचं साम्राज्य उभं केलं.
advertisement
5/11
लहानपणी जॉनी लिव्हर यांची परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांना आपले शिक्षण सोडावं लागलं. घरात पैशांची कमतरता असल्यामुळे या अभिनेत्याला सातवी इयत्तेनंतर शिक्षण घेतलं. अगदी लहान वयातच त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली.
advertisement
6/11
लहान वयातच जॉनी यांना शिक्षण सोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काम करावं लागलं. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जॉनी लिव्हर दिवस-रात्र पेन विकत असत. ते रस्त्यावर पेन विकायला जात आणि दिवसभराच्या कष्टानंतर घरी परतल्यावरच त्यांच्या कुटुंबाला जेवण मिळत असे.
advertisement
7/11
उदरनिर्वाहाचे साधन म्हणून सुरू झालेल्या या व्यवसायाने हळूहळू त्या अभिनेत्यामधील कलाकाराला जागे केले आणि ते विविध प्रकारे पेन विकू लागले. पेन विकताना ते बॉलिवूड कलाकारांची नक्कल करून लोकांना हसवायचा आणि आपली विक्री वाढवायचा. हे छोटे प्रयोगच पुढे त्यांच्या ओळखीचा पाया बनले.
advertisement
8/11
चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी जॉनी लिव्हरने स्टेज शो आणि ऑर्केस्ट्रामध्ये काम केलं. त्याची नक्कल आणि विनोदी अभिनयाने लवकरच लोकांचे लक्ष वेधून घेतलं. याच काळात त्यांना हिंदुस्थान लिव्हरमध्ये नोकरी मिळाली. जिथे त्याला 'जॉनी लिव्हर' हे नाव मिळाले. जे पुढे त्याची ओळख बनले.
advertisement
9/11
त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा तेव्हा आला जेव्हा प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांनी  चित्रपटांमध्ये संधी दिली. यानंतर जॉनी लिव्हरने कधीही मागे वळून पाहिलं नाही. 1990 च्या दशकात जॉनी लिव्हर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकारांपैकी एक बनला. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आणि प्रत्येक वेळी आपल्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांना हसवले.
advertisement
10/11
त्यांनी शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले. 'बाजीगर', 'करण अर्जुन', 'दुल्हे राजा' आणि 'दे दाना दान' यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. जॉनी लिव्हरचं वैशिष्ट्य केवळ त्याचा विनोद नाही तर त्यांचं टायमिंग आणि हावभावही आहेत. ते अगदी लहान दृश्यांनाही अविस्मरणीय बनवू शकतो. यामुळेच मल्टी-स्टारर चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलं
advertisement
11/11
आपल्या कठोर परिश्रमातून आणि समर्पणातून जॉनी लिव्हर धारावीच्या अरुंद गल्ल्यांमधून मुंबईच्या उच्चभ्रू लोखंडवाला परिसरात पोहोचले. आज जॉनी आपल्या कुटुंबासह एका डुप्लेक्समध्ये राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची सध्याची एकूण संपत्ती अंदाजे 255 कोटी रुपये आहे. जॉनीच्या पावलावर पाऊल ठेवत, त्याची मुलगी जेमी लिव्हर देखील या क्षेत्रात स्वतःचे नाव कमावत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
धारावीच्या झोपडपट्टीत बालपण, पैशांपायी सोडली शाळा; अभिनेता आज 225 कोटींच्या संपत्तीचा मालक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल