जालना : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. जालन्यामध्ये समृद्धी महामार्गावर एक भरधाव ट्रकने मजुरांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ६ ते ७ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची शिवारात ही घटना घडली आहे. समृद्धी महामार्गावर महिला मजूर या मार्गाच्या बाजूला काम करत होत्या. त्याचवेळी एका भरधाव ट्रकने महिला मजुरांना चिरडलं. या अपघातात 5 ते 6 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हा ट्रक नागपूरवरून मुंबईच्या दिशेने येत होता. ट्रकने समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या महिला मजुरांना चिरडून पुढे केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेल्या मजूर महिलांच्या मृतदेह पडलेले होते. हे दृश्य पाहून उपस्थितीत हादरले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी तालुका जालना पोलीस दाखल झाले आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी देखील मदतकार्य सुरू केलं आहे. काही जखमी महिला मजुरांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या होत्या महिला
घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर हे शासकीय रुग्णालयामध्ये पोहोचले होते. त्यांनी जखमी रुग्णांची माहिती घेतली. समृद्धी महामार्गावर भीषण आणि दु:खदायक घटना आहे. ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ ते ७ जण जखमी झाले आहे. या महिला समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या होत्या. या अपघातात पिकअपचा चालक जखमी झाला आहे. मजुरांना घेऊन जाताना ट्रकने उडवलं अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना सूचना करण्यात आली आहे, वैद्यकीय व्यवस्था तातडीने करण्यात आली आहे. मृत महिला या समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या होत्या. त्यांचा अशा प्रकारे मृत्यू होणे ही दुर्दैवी घटना आहे. मृतांच्या नातेवाईकांना एमएमआरडीएकडून मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली.
