TRENDING:

Success Story : शेण आणि गोमूत्रही बिझनेससाठी ठरलं फायदेशीर, महिन्याला 2 लाखांची उलढाल, विनय यांनी करुन दाखवलं!

Last Updated:

गोशाळेच्या माध्यमातून गाईच्या दुधापासून तसेच शेण आणि गोमूत्रापासून विविध खाद्यपदार्थ आणि वस्तू तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमातून महिन्याला 2 लाखांची उलाढाल होत असल्याचे त्यांनी सांगितलं.

advertisement
पुणे: गेल्या काही वर्षांपासून शेतकरी दुग्धव्यवसायाला आधुनिकतेची जोड देत आहेत. केवळ दूध विक्रीवरच न थांबता, गाईच्या शेणापासून तसेच गोमूत्रापासून विविध उत्पादने तयार करून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत. पुण्यातील विनय वर्मा यांनी गोशाळेच्या माध्यमातून गाईच्या दुधापासून तसेच शेण आणि गोमूत्रापासून विविध खाद्यपदार्थ आणि वस्तू तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमातून महिन्याला 2 लाखांची उलाढाल होत असल्याचे त्यांनी सांगितलं. या व्यवसायाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
advertisement

दूध, शेण आणि गोमूत्रापासून उत्पादने

विनय वर्मा यांनी सांगितले की, त्यांनी सुरुवातीला फक्त 2 गाईंनी व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांच्या गोशाळेत एकूण 22 गाई असून, या गाईंच्या माध्यमातून महिन्याला तब्बल 2 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. ते गाईच्या दुधापासून पनीर तसेच विविध मिठाईचे पदार्थ तयार करतात. तसेच गाईच्या शेणापासून दिवे, अगरबत्ती, शेणाची लादी, शेणाच्या मूर्ती तसेच विविध डिझाईनच्या वस्तू तयार करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय गाईच्या गोमूत्रापासून शुद्धीकरणासाठी गोमूत्र बॉटल तयार केली जाते. तसेच गोमूत्रापासून फिनेलसारखे स्वच्छता उत्पादनही बनवले जाते. गाईच्या दुधासोबत शेण आणि गोमूत्रावर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार केली तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो, असेही वर्मा यांनी सांगितले.

advertisement

कमी खर्चात शेतकऱ्यांना अधिक नफा मिळवण्याची संधी

शेणापासून तसेच गोमूत्रापासून तयार होणाऱ्या वस्तू आणि पदार्थांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मार्केटचा योग्य अभ्यास करून शेतकरी वर्गाने या वस्तू तयार केल्या तर त्यातून मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. शेणापासून वस्तू बनवण्यासाठी फारसा खर्च लागत नाही, कारण शेण सहज उपलब्ध होते. ते फक्त वाळवून त्यावर थोडी प्रक्रिया करून विविध वस्तू तयार करता येतात. गोमूत्राच्या बाबतीतही फार मोठी प्रक्रिया करावी लागत नाही, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि नफा अधिक मिळू शकतो. त्यामुळे दुधासोबत शेण आणि गोमूत्रापासून उत्पादने तयार करून शेतकरी वर्गाने उत्पन्न वाढवण्यावर लक्ष द्यावे, असे विनय वर्मा यांनी सांगितले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Success Story : शेण आणि गोमूत्रही बिझनेससाठी ठरलं फायदेशीर, महिन्याला 2 लाखांची उलढाल, विनय यांनी करुन दाखवलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल