TRENDING:

38 वर्षांचं करिअर, 20 हजार पेक्षा जास्त गाणी गायली; 'मेलडी क्वीन' जिला आता ऐकूच येत नाहीये

Last Updated:
Singer : गेल्या काही महिन्यांपासून ही प्रसिद्ध गायिका संगीत जगतापासून दूर दूर आहे. नुकतंच एका मुलाखतीत तिने यामागील कारण सांगितलं आहे. जे धक्कादायक आहे.
advertisement
1/7
38 वर्षांचं करिअर, 20 हजार पेक्षा जास्त गाणी गायली; 'मेलडी क्वीन' जिला आता ऐकूच येत नाहीये
संगीत क्षेत्रातील करिअरची तिची 38 वर्षे. इतक्या वर्षात तिने हिंदी आणि इतर भाषांमध्ये अशा 20 हजारांहून अधिक गाण्यांना आपला आवाज दिला. पण गेल्या काही महिन्यांपासून हा आवाज ऐकू येईना. ती बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीत असल्याने नवीन गाण्यांमध्ये तिची अनुपस्थिती स्पष्टपणे जाणवत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही प्रसिद्ध गायिका संगीत जगतापासून दूर दूर आहे.
advertisement
2/7
2024 साली तिने एका फिल्मसाठी शेवटचं रेकॉर्डिंग केलं. त्यानंतर कोणत्याही नवीन गाण्याला तिने आपला आवाज दिला नाही. अखेर या गायिकेने यामागील कारणाचा खुलासा केला आहे.
advertisement
3/7
तिला श्रवणक्षमतेशी संबंधित गंभीर आजार झाला आहे. ज्यामुळे तिला ऐकू येत नाही. 2024 साली तिला तिच्या या आजाराबद्दल समजलं. तेव्हापासून संगीतापासून काही काळ दूर राहण्याचा निर्णय तिने घेतला.
advertisement
4/7
गायिकेने तेव्हा सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दिली होती. तसंच  तिने आपल्या चाहत्यांना या काळात तिच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं होतंय. 
advertisement
5/7
आपल्या अनुभवानंतर श्रवणशक्ती कमी होणं किती गंभीर असू शकतं याबद्दल तिने चाहत्यांना सावध केलं. तिने लोकांना गोंगाट आणि विशेषतः हेडफोन वापरताना आपल्या कानांची काळजी घेण्याचा, मोठ्या आवाजात संगीत न ऐकण्याचा सल्ला दिला होता.
advertisement
6/7
नुकत्याच एका मुलाखतीत गायिकेने अजूनही आपल्याला ऐकण्यात समस्या येत असल्याचं सांगितलं. "कम्पोझर्स कधी कधी आपल्याशी संपर्क करतात, पण मी आता ते करू शकत नाही. नवीन म्युझिक प्रोजेक्ट्स पूर्ण करू शकत नाहीये", असं ती म्हणाली.
advertisement
7/7
ही गायिका आहे अल्का याज्ञिक. जिने 'नरम कालजा' हे शेवटचं गाणं गायलं होतं. इम्तियाज अली यांच्या 'अमर सिंग चमकिला' फिल्ममधील हे गाणं जे ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केले होतं. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
38 वर्षांचं करिअर, 20 हजार पेक्षा जास्त गाणी गायली; 'मेलडी क्वीन' जिला आता ऐकूच येत नाहीये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल