अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या अडचणी वाढणार? मावळच्या शेतकऱ्याने थेट कोर्टात खेचलं; नेमकं प्रकरण काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sonali Bendre: बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिच्या सौंदर्याने आजही चाहत्यांना घायाळ करते. पण सध्या सोनाली एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
advertisement
1/8

<strong>गणेश दुडम - प्रतिनिधी, पुणे/मावळ :</strong> बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेत्री सोनाली बेंद्रे तिच्या सौंदर्याने आजही चाहत्यांना घायाळ करते. पण सध्या सोनाली एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. शेतजमिनीच्या वादामुळे सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बेहल मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
advertisement
2/8
मावळमधील एका शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीवरून हे जोडपं आता कायदेशीर कचाट्यात अडकल्याचं चित्र दिसत आहे. स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी या प्रकरणी थेट वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली असून, या सेलिब्रिटी जोडीवर गंभीर आरोप केले आहेत.
advertisement
3/8
चंद्रकांत शिंदे यांनी दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यानुसार, उकसान येथील संबंधित ३० गुंठे जमीन ही त्यांच्या कुटुंबाकडे १९५७ पूर्वीपासून कुळ हक्काने ताब्यात आहे.
advertisement
4/8
अशातच चंद्रकांत यांनी सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्यावर आरोप केला आहे की त्यांनी ही जमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे हा हक्क डावलून ही जमीन विकत घेतली असून संबंधित जागेवर बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न केला आहे. इतकंच नाही, तर चंद्रकांत यांनी सोनाली आणि गोल्डी यांनी कुटुंबीयांना दमदाटी केल्याचाही आरोप केला आहे.
advertisement
5/8
याप्रकरणी यापूर्वीही पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने आता यासंबंधी न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.
advertisement
6/8
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर सोनाली बेंद्रे आणि गोल्डी यांची बाजू मांडताना त्यांचे वकील राजू शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेत हे सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे.
advertisement
7/8
राजू शिंदे म्हणाले, "फिर्यादी शेतकरी हे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि सेलिब्रिटींकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने हा बनाव रचत आहेत. सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बहल यांची प्रतिमा मलीन करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे."
advertisement
8/8
सेलिब्रिटी विरुद्ध सामान्य शेतकरी असा वाद उभा राहिल्यामुळे उकसान गावात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या न्यायालयात या जमिनीवर 'मनाई आदेश' देण्याची मागणी करण्यात आली आहे. या अर्जावर आता २० एप्रिल रोजी सुनावणी होणार असून काय निकाल लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या अडचणी वाढणार? मावळच्या शेतकऱ्याने थेट कोर्टात खेचलं; नेमकं प्रकरण काय?