TRENDING:

उद्या हनुमान जयंती! बजरंगबलीच्या कृपेने 'या' राशींना मिळणार 'गोल्डन चान्स', पैशांची तंगी होईल दूर; होणार तगडा फायदा

Last Updated:
उद्या देशभरात 'हनुमान जयंती' मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने यंदाची हनुमान जयंती अत्यंत खास आहे, कारण या दिवशी अनेक शुभ योगांचा दुर्मिळ संगम होत आहे.
advertisement
1/7

2/7
मेष - नवीन कामात यश आणि ऊर्जा: मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याने हनुमंताची तुमच्यावर विशेष कृपा राहील. उद्यापासून तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी 'बंपर' ठरेल. प्रलंबित असलेली सरकारी कामे मार्गी लागतील.
advertisement
3/7
वृषभ - अचानक धनलाभ आणि सुख-समृद्धी: वृषभ राशीच्या जातकांना उद्या एखादी मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून अनपेक्षित धनलाभ होईल. पैशांची तंगी दूर झाल्यामुळे तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे नियोजन करू शकाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
advertisement
4/7
सिंह - मान-सन्मान आणि पदोन्नती: प्रभू रामाचे परम भक्त हनुमान सिंह राशीच्या लोकांसाठी यशाची दारे उघडतील. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होऊन पदोन्नतीचे योग येतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध सुधारतील, ज्याचा फायदा भविष्यात होईल.
advertisement
5/7
वृश्चिक - शत्रूंवर विजय आणि कर्जमुक्ती: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस वरदान ठरेल. हनुमानजींच्या कृपेने तुमच्या गुप्त शत्रूंचा नाश होईल. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली असाल, तर उद्या केलेले विशेष उपाय तुम्हाला कर्जमुक्तीच्या दिशेने नेतील. तुमची प्रबळ इच्छाशक्ती तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल.
advertisement
6/7
धनु - भाग्याची साथ आणि प्रगती: धनु राशीच्या जातकांना उद्या नशिबाची भक्कम साथ मिळेल. थांबलेली कामे वेगाने पूर्ण होतील. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी उद्याचा दिवस अत्यंत सकारात्मक राहील. आर्थिक आवक वाढल्यामुळे तुमची बचत वाढेल.
advertisement
7/7
कुंभ - साडेसातीचा प्रभाव कमी होणार: कुंभ राशीत शनीची साडेसाती सुरू असली तरी, हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीरायाची उपासना केल्याने तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. शनी देवाच्या पिडेतून तुमची सुटका होईल आणि मानसिक शांतता लाभेल. अचानक रखडलेले पैसे परत मिळाल्याने तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
उद्या हनुमान जयंती! बजरंगबलीच्या कृपेने 'या' राशींना मिळणार 'गोल्डन चान्स', पैशांची तंगी होईल दूर; होणार तगडा फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल