वेट अँड वॉच! 14 एप्रिल 9 वाजून 38 मिनिटं, हीच वेळ पालटणार नशीब, 'या' राशींचा सुरू होणार 'गोल्डन टाइम'
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह येत्या 14 एप्रिल 2026 रोजी आपली राशी बदलणार आहे. सूर्य देव मीन राशीतून बाहेर पडून आपल्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करतील.
advertisement
1/7

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य ग्रह येत्या 14 एप्रिल 2026 रोजी आपली राशी बदलणार आहे. सूर्य देव मीन राशीतून बाहेर पडून आपल्या उच्च राशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करतील. सूर्याचे हे राशी परिवर्तन सकाळी 09 वाजून 38 मिनिटांनी होईल.
advertisement
2/7
मेष - आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वात सुधार: सूर्य तुमच्याच राशीत उच्च स्थितीत येणार असल्याने तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. सरकारी कामात अडकलेल्या लोकांसाठी हा काळ यशाचा ठरेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि तुमच्या नेतृत्वाखालील कामांना गती मिळेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन तुम्ही अधिक उत्साही राहाल.
advertisement
3/7
वृषभ - परदेश प्रवास आणि प्रगती: वृषभ राशीच्या जातकांसाठी हे गोचर परदेशाशी संबंधित कामात यश मिळवून देणारे ठरेल. जे लोक मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करतात किंवा ज्यांचा व्यापार परदेशाशी निगडित आहे, त्यांना मोठी सुवर्णसंधी मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि खर्चावर नियंत्रण मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
advertisement
4/7
मिथुन - अचानक धनलाभ आणि उत्पन्नात वाढ: मिथुन राशीच्या लाभ स्थानी सूर्याचे हे भ्रमण होणार आहे. यामुळे तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षित परतावा मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती भक्कम होईल. मित्र-परिवाराचे सहकार्य लाभेल आणि एखादी मोठी व्यावसायिक डील तुमच्या हाती लागू शकते.
advertisement
5/7
कर्क - करिअरमध्ये मोठी झेप आणि नवी नोकरी: कर्क राशीच्या दहाव्या भावात सूर्याचे गोचर अत्यंत शुभ मानले जाते. नोकरी शोधणाऱ्यांना हवी तशी संधी मिळेल. जे आधीच नोकरीत आहेत, त्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची आनंदवार्ता मिळू शकते. प्रशासकीय किंवा राजकारणाशी संबंधित लोकांना या काळात मोठे पद मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
6/7
सिंह - भाग्याची साथ आणि तीर्थयात्रा: सिंह राशीचा स्वामी सूर्य असून तो तुमच्या भाग्य स्थानी उच्च होणार आहे. यामुळे तुम्हाला नशिबाची भक्कम साथ मिळेल. प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली तुमची कामे आता विनाअडथळा पूर्ण होतील. आध्यात्मिक कार्यात तुमची ओढ वाढेल आणि कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचे योग आहेत.
advertisement
7/7
कन्या - गूढ विद्येत रस आणि अनपेक्षित यश: कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचर संमिश्र असले तरी प्रगतीचे असेल. तुम्हाला संशोधनाच्या कामात किंवा गूढ विषयात मोठे यश मिळेल. सासरच्या मंडळींकडून सहकार्य लाभेल. शत्रूंवर तुम्ही विजय मिळवाल आणि तुमच्या कार्यक्षेत्रातील आव्हाने जिद्दीने पार कराल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
वेट अँड वॉच! 14 एप्रिल 9 वाजून 38 मिनिटं, हीच वेळ पालटणार नशीब, 'या' राशींचा सुरू होणार 'गोल्डन टाइम'