TRENDING:

Poonam Pandey : बाळाचा बाप कोण? बेबी बम्पचा फोटो शेअर केल्यानंतर पूनम पांडेने आता सगळं सांगूनच टाकलं

Last Updated:
Poonam Pandey : पूनम पांडे प्रेग्नंट असल्याचे फोटो पाहिल्यानंतर तिच्या बाळाचे वडील कोण, असा प्रश्नसोशल मीडियावरील तिच्या फोटोच्या कमेंटवर आले. अखेर पूनमने सगळं खरं काय ते सांगितलं आहे.
advertisement
1/7
बाळाचा बाप कोण? बेबी बम्पचा फोटो शेअर केल्यानंतर पूनम पांडेने आता सगळं सांगूनच टाकलं
बॉलिवूडमधील सर्वात वादग्रस्त सेलिब्रिटींपैकी एक पूनम पांडे, तिच्या  कामापेक्षा कॉन्ट्रोवर्सीमुळे सर्वाधिक चर्चेत आली आहे. आता तिने सोशल मीडियावर तिच्या बेबी बम्पचा फोटो शेअर केला आणि सगळ्यांना धक्का बसला.  पूनम पांडेने ती प्रेग्नंट असल्याचा फोटो शेअर केला तिने टी-शर्ट घालून आणि टी-शर्ट वर करूनही तिचं बेबी बम्प दाखवलं. 
advertisement
2/7
पूनम पांडे प्रेग्नंट आहे, तिचे हे फोटो पाहूनही त्यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. कुणी याला एआय फोटो म्हटलं, कुणी प्रँक म्हटलं. काहींनी तिचे हे फोटो खरं मानून तिचं अभिनंदन केलं, पण सोबतच बाळाचा बाप कोण आहे, असं बहुतेकांनी तिच्या या फोटोच्या कमेंटमध्ये विचारलं. 
advertisement
3/7
5 वर्षांआधीच पूनमचा डिवोर्स झाला आहे. तिने 2020 मध्ये बॉयफ्रेंड सॅम अहमद बॉम्बेशी लग्न केलं होतं. पण नंतर तिने त्याच्यावर विनयभंग, मारहाण आणि धमक्या यांसारखे गंभीर आरोप केले. त्याला गोव्यात अटक झाली. त्यानंतर दोघं वेगळे झाले.
advertisement
4/7
दरम्यान आता पूनमने आपला एक नवीन व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात तिने तिच्या प्रेग्नन्सीसाठी तिचं अभिनंदन करणाऱ्यांचे आभार मानले आहेत आणि आपल्या प्रेग्न्सीबाबत सगळं काही सांगून टाकलं आहे.
advertisement
5/7
पूनम म्हणाली, "शेवटी मी पूनम पांडे आहे, तुम्हाला धक्का देणं हा माझा हक्क आहे. आयुष्याला इतकं गांभीर्याने घेऊ नका, थोडं चील करा. तुमच्या अभिनंदनासाठी खूप खूप धन्यवाद. पण मी प्रेग्नंट नाही आहे. हा प्रँक होता. युद्ध सुरू आहे, संपूर्ण जग तणावात आहे, मला वाटलं थोडं तुमचं मनोरंजन करू" एप्रिल फूल बनाया उनको गुस्सा आया, असं ती शेवटी म्हणते.
advertisement
6/7
दोन वर्षांपूर्वीही पूनमने स्वतःच्या मृत्यूचं नाटक केलं होतं. 2024 मध्ये तिच्या टीमनं सोशल मीडियावर गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाल्याची पोस्ट लिहिली होती. काही दिवसांनंतर टीमने खुलासा केला की हा केवळ एक प्रँक होता. अभिनेत्रीने तेव्हा हा आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेला एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं सांगितलं होतं. 
advertisement
7/7
पण त्यानंतर पूनमला सोशल मीडियावर खूप टीका आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागला आणि आता त्यामुळे तिच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा अशा विचारात सगळे आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Poonam Pandey : बाळाचा बाप कोण? बेबी बम्पचा फोटो शेअर केल्यानंतर पूनम पांडेने आता सगळं सांगूनच टाकलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल