सर्वसामान्यांना मोठा धक्का! प्रिमियम पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ, पाहा आजचा दर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सर्वसामान्य लोकांना मोठा धक्का बसला आहे. आज एलपीजीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यासोबतच आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही वाढल्या आहेत.
advertisement
1/5

नवी दिल्ली : आखाती देशांमध्ये युद्ध सुरू आहे. या इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल करण्यात आलेय. Indian Oil Corsporation (IOCL) कडून प्रीमियम इंधनाच्या किंमतीत वाढ करण्यात आलीये. कंपनीने 100 ऑक्टोन पेट्रोल म्हणजेच XP100 पेट्रोलच्या किंमती वाढवल्या आहेत. दिल्लीत या किंमत 149 रुपयांनी वाढून 160 रुपये प्रति लिटर केल्या आहेत.
advertisement
2/5
प्रीमियम डिझेल 'एक्स्ट्रा ग्रीन'ही महाग झालंय. याची किंमत 91.49 रुपये होती. जी वाढून 92.99 रुपये प्रति लिटर झालीये. हे नवीन दर IOCL च्या सर्व आउटलेट्सवर लागू करण्यात आलेय. सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती या स्थिर आहेत.
advertisement
3/5
इंडियन ऑइल कॉपरेशनने आतापर्यंत प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्याचं स्पष्ट कारण सांगितलं नाही. पण ग्लोबल मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार आणि अमेरिका-इराण युद्धामुळे वाढलेल्या लॉजिस्टिक्स खर्चामुळे या किंमती वाढलेल्या असू शकतात.
advertisement
4/5
पेट्रोल आणि डीझेलवर एक्साइज ड्यूटी हटवली : 27 मार्च रोजी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्यूटी 10-10 रुपये प्रति लिटरने कमी केलीये. सरकारी तेल कंपन्यांवरील वाढता आर्थिक दबाव कमी करणे आणि देशात पुरेसा पुरवठा कायम ठेवणं हे यामागील कारण आहे. यामुळे तेल कंपन्यांना मोठा दिलासा मिळालाय. कारण रिटेल किमतींना स्थिर ठेवण्यासाठी पहिले या कंपन्या मोठं नुकसान सहन करत होत्या.
advertisement
5/5
देशभरात पेट्रोल-डिझेला तुटवडा नाही : आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार असुनही भारत सरकारने संकेद दिलाय की, सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही. सरकारने सांगितल्यानुसार, तेल कंपन्या कंपन्यांमध्ये होणाऱ्या बदलाचा काही भाग स्वतः मॅनेज करत आहेत. जेणेकरुन ग्राहकांना अचानक किंमती वाढल्याचा धक्का बसू नये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
सर्वसामान्यांना मोठा धक्का! प्रिमियम पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ, पाहा आजचा दर