TRENDING:

तयारी सुरू झालीये, खरंच या माणसाची कमाल आहे... शरद पवार यांना भेटल्यानंतर संजय राऊतांचं ट्विट

Last Updated:

शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे काहीसे एकांतवासात आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणे त्यांनी टाळले आहे. परंतु त्यांची प्रकृती आता सावरली असून लवकरच ते महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी बुधवारी शरद पवार यांची भेट घेतली. भेटीनंतर शरद पवार यांची अढळ इच्छाशक्ती दर्शविणारे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
शरद पवार-संजय राऊत
शरद पवार-संजय राऊत
advertisement

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार यांच्यावर मोठा आघात झाला. त्यानंतरचे काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. यादरम्यान त्यांच्यावर पुणे आणि मुंबईत उपचार करण्यात आले. आता शरद पवार यांची प्रकृती सावरत असून सार्वजनिक जीवनात सक्रीय होण्यासाठी ते उत्सुक असल्याचे संजय राऊत म्हणाले. पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली.

advertisement

खरंच या माणसाची कमाल आहे!

"आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली. मी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. साहेबांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. अनेक विषयांवर चर्चा झाली! राज्यात फिरण्याची त्यांची तयारी सुरू आहे झाली आहे. या माणसाची खरंच कमाल आहे", असे भेटीनंतर संजय राऊत म्हणाले. शरद पवार वयाच्या ८७ व्या वर्षीही महाराष्ट्र फिरण्यासाठी सज्ज असल्याचे सांगत त्यांच्या इच्छशक्तीचे राऊत यांनी कौतुक केले आहे.

advertisement

राऊत-पवार यांचा जिव्हाळा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Agriculture Tips: शेतीला कीड-रोगांचा धोका, उन्हाळ्यात कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video
सर्व पहा

शिवसेना पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची बाजू खमकेपणाने मांडणारे, महाविकास आघाडी सरकार बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले, शिवसेनेत फूट पडल्यानंतर सोडून गेलेल्या सगळ्या नेत्यांना अंगावर घेऊन महाराष्ट्रात रान उठवणारे नेते, मुलूखमैदानी तोफ म्हणून संजय राऊत यांची ओळख आहे. परंतु भिन्न विचारसरणी असलेल्या पक्षात असूनही शरद पवार यांचे अतिशय निकटवर्तीय नेते म्हणून राऊत यांना ओळखले जाते. गेली अनेक दशके राऊत-पवारांनी जिव्हाळा जपला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तयारी सुरू झालीये, खरंच या माणसाची कमाल आहे... शरद पवार यांना भेटल्यानंतर संजय राऊतांचं ट्विट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल