फूल स्पीड करुनही फॅन हवा देत नाहीये? फक्त 60 रुपयांत होईल काम, सुपरफास्ट फिरेल पंखा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
उन्हाळ्यात फॅनने सुपरफास्ट स्पीडने फिरावं असं प्रत्येकाला वाटतं. पण फूल स्पीड केली तरीही तुमचा फॅन हवा देत नाहीये का? असं असेल तर याची काही कारणं असू शकतात. तुम्ही अगदी काही मिनिटांत ही समस्या दूर करू शकता.
advertisement
1/7

मुंबई : उन्हाळा सुरू झाला आणि यावेळी फॅनने सुपरफास्ट स्पीडने हवा द्यावी असं सर्वांनाच वाटत असतं. पण अनेकदा फॅन खुपच हळुहळू चालतो तेव्हा प्रॉब्लम निर्माण होतो. कारण हवा कमी लागते आणि खोली गार होत नाही. विनाकारण वीज वाया जाते. तुमच्या घरातील छताचा पंखा किंवा टेबल फॅनही पहिल्यासारखा काम करत नसेल तर टेन्शन घेऊ नका. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये फॅन हा सहज घरीच ठिक केलाजाऊ शकतो.
advertisement
2/7
पंख्याची स्पीड का कमी होते: पंख्याची स्पीड कमी होण्याची काही कारणं असतात. यामध्ये कॅपेसिटर खराब असणे. बेयरिंगमध्ये खुपच घर्षण होणे किंवा ते सुखने. लूज वायरिंग किंवा कनेक्शन. रेग्युलेटरची समस्या असणे. कमी व्होल्टेज किंवा जुना पंखा. आता पंख्याची स्पीड कशी वाढवावी हे जाणून घेऊया.
advertisement
3/7
स्वच्छ करा : सर्वात आधी फॅन बंद करुन त्याचे ब्लेड, ग्रिल आणि मोटर स्वच्छ करा. ब्लेडवर जमा झालेली धूळ हवा अडवते. थोडासा कापड ओला करा किंवा ब्रशने स्वच्छ करा. ग्रिल ओपन करुन आतील धूळही काढा. स्वच्छ केल्यानंतर फॅन चालू करुन पाहा. अनेकदा स्पीड ही आपोआप वाढते.
advertisement
4/7
कॅपेसिटर चेक करा : जास्तीत जास्त पंख्यांमध्ये स्पीड कमी होण्याचं प्रमुख कारण हे खराब कॅपेसिटर असते. लहानसा सिलेंडर सिलेंडरसारखा पार्ट असतो. फॅन हळुहळू चालत असेल आणि आवाज येत सेल. कॅपेसिटर बदलणं गरजेचं असतं. मार्केटमध्ये कॅपेसिटीर हे 50-60 रुपयांना उपलब्ध असतं. आधी जुनं कॅपेसिटर काढा आणि नवं लावा. हे काम सोपं आहे. पण इलेक्ट्रिशियनकडून करुन घ्या.
advertisement
5/7
बेयरिंग ऑइलिंग करा : जुन्या पंख्यांमध्ये बेयरिंग कोरडी होते. पंख्याचा वरचा भाग ओपन करुन थोडं मशीन ऑइल किंवा बेयरिंग ऑइल टाका. यामुळे घर्षण कमी होते आणि स्पीड वाढते.
advertisement
6/7
वायरिंगआणि कनेक्शन चेक करा : लूज कनेक्शन, गंज लागलेल्या तार किंवा खराब रेग्युलेटरनेही देखील स्पीड कमी होते. स्विच ऑफ करुन सर्व कनेक्शन टाइट करा. रेग्युलेटर जुनं असेल तर ते देखील बदलू शकता.अनेकदा कमी व्होल्टेजमुळे पंखा हळु चालतो. स्टेबलायजर किंवा चांगलं रेग्युलेटरचा वापर करा.
advertisement
7/7
अॅडिशनल टिप्स : वर्षात किमान दोनवेळा पंख्याची सर्व्हिसिंग करा. नवीन पंखा खरेदी करताना BLDC किंवा 5-स्टार एनर्जी सेव्हिंग निवडा. जास्त स्पीडसाठी ब्लेड योग्य अँगलवर सेट करा. या सोप्या स्टेप्स फॉलो केल्यास तुमचा फॅन पुन्हा सुपरफास्ट हवा देईल. समस्या कायम राहिली तर एखाद्या चांगल्या इलेक्ट्रीशियनला बोलवा. स्वतः प्रयोग करताना वीज बंद ठेवा आणि सावध व्हा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
फूल स्पीड करुनही फॅन हवा देत नाहीये? फक्त 60 रुपयांत होईल काम, सुपरफास्ट फिरेल पंखा