TRENDING:

Health : पोहे की पराठा? सकाळी नाश्त्याला काय खावं? वजन कमी करण्यासाठी 'हा' पर्याय सर्वात बेस्ट

Last Updated:
जेव्हा प्रश्न आरोग्याचा आणि फिटनेसचा येतो, तेव्हा मनात शंका येते की नक्की या दोघांपैकी सुपरफूड कोणतं? वजन कमी करायचं असेल तर काय खावं आणि दिवसभर भरपूर ऊर्जा हवी असेल तर कशाची निवड करावी? चला तर मग, तुमच्या आवडत्या नाश्त्याचा हा हेल्थ रिपोर्ट सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/8
Health : पोहे की पराठा? सकाळी नाश्त्याला काय खावं? वजन कमी करण्यासाठी 'हा' पर्याय सर्वात बेस्ट
सकाळी नाष्टाला वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. ज्यामध्ये सर्वात कॉमन आहे ते म्हणजे पोहो, तर काहींचा घरी थोडं हेवी नाष्टा केला जातो, कारण सकाळी पोट भरलेलं असेल तर दिवसभर एनर्जी रहाते असं म्हणतात. पण जेव्हा प्रश्न आरोग्याचा आणि फिटनेसचा येतो, तेव्हा मनात शंका येते की नक्की या दोघांपैकी सुपरफूड कोणतं? वजन कमी करायचं असेल तर काय खावं आणि दिवसभर भरपूर ऊर्जा हवी असेल तर कशाची निवड करावी? चला तर मग, तुमच्या आवडत्या नाश्त्याचा हा हेल्थ रिपोर्ट सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
2/8
पराठा हा सहसा गव्हाच्या पिठापासून बनवला जातो, जो 'कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स'चा उत्तम स्त्रोत आहे. हा खाल्ल्यानंतर शरीराला हळूहळू ऊर्जा मिळते, ज्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही. जर तुम्ही त्यात पनीर, डाळ, मेथी किंवा पालकाचं सारण भरलं, तर तो प्रथिनांनी (Protein) समृद्ध होतो.
advertisement
3/8
कधी ठरतो हेल्दी? जर पराठा कमी तेल किंवा तुपात भाजला असेल आणि सोबत लोणच्याऐवजी दही किंवा कोशिंबीर असेल, तर तो एक परिपूर्ण आहार मानला जातो. पीठात नाचणी किंवा ओट्स मिसळून तुम्ही त्याला अधिक पौष्टिक बनवू शकता.
advertisement
4/8
हलकेफुलके पोहे: पचायला सोपे आणि लो-कॅलरीजर तुम्हाला सकाळी जड जेवण नको असेल, तर पोहे हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.पोहे तांदळापासून बनत असले तरी ते पचायला अत्यंत हलके असतात. उन्हाळ्याच्या दिवसात किंवा प्रवासाला निघताना पोहे खाणं अधिक सोयीचं ठरतं. यात कॅलरीज आणि फॅट्स कमी असतात, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणाऱ्यांसाठी हा गोल्डन पर्याय आहे.
advertisement
5/8
पोहे हे लोहाचे (Iron) चांगले स्त्रोत आहेत. जर तुम्ही त्यात शेंगदाणे, मटार, गाजर आणि कांदा अशा भाज्या घातल्या, तर त्यातील फायबर आणि विटामिन्सचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
advertisement
6/8
तज्ज्ञ काय म्हणतात? कोणाची निवड करावी?दिल्लीतील प्राकृतिक डाएट क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉ. शिवानी सीकडी यांच्या मते, या दोघांची निवड तुमच्या गरजेनुसार असायला हवी:1. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल: तर पोहे हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण ते लो-फॅट आहेत आणि लवकर पचतात.2. जर तुम्हाला दिवसभर शारीरिक कष्ट करायचे असतील: तर पराठा निवडा. तो तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जा देईल आणि वारंवार भूक लागू देणार नाही. यामुळे ही तुम्ही कमी खाल आणि वजन नियंत्रणात राहिल
advertisement
7/8
दोन्ही पदार्थ आपल्या जागी आरोग्यदायी आहेत, फक्त ते बनवण्याची पद्धत योग्य हवी. अति तेलकट पराठा किंवा खूप साखर घातलेले पोहे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. तुमच्या शरीरप्रकृतीनुसार योग्य निवड करा आणि दिवसाची सुरुवात उत्साहाने करा.
advertisement
8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health : पोहे की पराठा? सकाळी नाश्त्याला काय खावं? वजन कमी करण्यासाठी 'हा' पर्याय सर्वात बेस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल