TRENDING:

VIDEO : आधी अंगावर धावला, मग डोळ्यांनी खुन्नस दिली,LIVE मॅचमध्ये खेळाडू भिडले, नेमकं काय घडलं?

Last Updated:

दोन विकेट पडल्यानंतर प्रिन्स यादवने दिल्ली कॅपिटल्सची आणखी खराब हालत केली. कारण प्रिन्सने पाचव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर पथून निसांकाला 1 धावांवर बाद केले.त्यानंतर मैदानात आलेल्या कॅप्टन अक्षर पटेलला त्याने तिसऱ्याच बॉलवर डकवर आऊट करत माघारी धाडलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Prince Yadav Tristan Stubbs words Exchange : आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जाएटसने 141 धावांची खेळी केली होती. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्ससमोर 142 धावांचे लक्ष्य आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात मोठा राडा झाला आहे. लखनऊ सुपर जाएसच्या बॉलर आणि दिल्ली कॅपिटल्सचे बॉलर आपआपसात भिडले आहेत.त्यामुळे मैदानात मोठा राडा झाला आहे. या राड्याच्या व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
Prince Yadav Tristan Stubbs words Exchange
Prince Yadav Tristan Stubbs words Exchange
advertisement

खरं तर लखनऊ सुपर जाएटसने दिलेल्या 141 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सूरूवात खराब झाली होती.कारण मोहम्मद शमीने पहिल्याच बॉलवर केएल राहुलला बाद केले होते.त्यानंतर नितीश राणा मैदानात आला होता. पण चौथ्या ओव्हरमध्ये मोहसीन खानने नितीशला 15 धावांवर बाद केले होते.

दरम्यान दोन विकेट पडल्यानंतर प्रिन्स यादवने दिल्ली कॅपिटल्सची आणखी खराब हालत केली. कारण प्रिन्सने पाचव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर पथून निसांकाला 1 धावांवर बाद केले.त्यानंतर मैदानात आलेल्या कॅप्टन अक्षर पटेलला त्याने तिसऱ्याच बॉलवर डकवर आऊट करत माघारी धाडलं.अशाप्रकारे प्रिन्सने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या आहेत.

advertisement

अक्षर पटेल बाद होताच ट्रिस्टन स्टब्स मैदानात आला होता.यावेळी त्याने दोन विकेट घेतलेल्या प्रिन्स यादवच्या चौथ्या बॉलवर जबरदस्त चौकार मारला होता. हा चौकार पाहून प्रिन्सची सटकली होती. त्यानंतर त्याने पाचवा बॉल टाकला पण स्टब्सला तो मारताच आला नाही.त्यामुळे प्रिन्स यादव तोऱ्यात त्याच्याजवळ गेला आणि त्याला डोळे दाखवत खुन्नस दाखवत होता.यावर ट्रिस्टन स्टब्स ही थांबला त्याने देखील त्याला खुन्नस दिली होती. यावेळी दोन्ही खेळाडू आपआपसात काहीतरी पुटपुटत होते. त्यामुळे मैदानात मोठा राडा झाला होता. या राड्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

advertisement

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (विकेटकिपर) ,पथुम निसांका, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, विपराज निगम, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाचे दर घसरले, कांद्याला भाव वाढ नाहीच, केळीची काय स्थिती?
सर्व पहा

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकिपर/कॅप्टन), आयुष बडोनी, अब्दुल समद, मुकुल चौधरी, मोहसीन खान, मोहम्मद शमी, एनरिक नॉर्टजे, प्रिन्स यादव

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : आधी अंगावर धावला, मग डोळ्यांनी खुन्नस दिली,LIVE मॅचमध्ये खेळाडू भिडले, नेमकं काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल