TRENDING:

Weather Alert : महाराष्ट्रावरील अवकाळी संकट कायम, गुरुवारी वादळी वार्‍यासह कोसळणार पाऊस, 32 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले असून राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाहुयात विभागानुसार हवामानाचा अंदाज.
advertisement
1/7
महाराष्ट्रावरील अवकाळी संकट कायम, गुरुवारी वादळी वार्‍यासह कोसळणार पाऊस, 32 जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ पहायला मिळत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. 2 एप्रिल रोजी हवामान विभागाने राज्यातील 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 23 जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले असून राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाहुयात विभागानुसार हवामानाचा अंदाज.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी पाऊस कोसळेल. ताशी 30-40 किमी वेगवान वारे वाहतील.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये जोरदार पावसासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून येथे मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा वेग वाढू शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी.
advertisement
5/7
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहतील. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धराशीवाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घ्यावी.
advertisement
6/7
विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ आणि वाशिमलाही अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील.
advertisement
7/7
दरम्यान, राज्यात 2 एप्रिल रोजी अवकाळीचा धोका कायम आहे. या काळात वीज पडणे, जोरदार वारे आणि गारपिटीमुळे शेती, फळबागा आणि पशुधनाला नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रावरील अवकाळी संकट कायम, गुरुवारी वादळी वार्‍यासह कोसळणार पाऊस, 32 जिल्ह्यांना अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल