Arjun Tendulkar : 'क्रिकेटर माझे मित्र नाहीत...' अर्जुन तेंडुलकर भावुक झाला, मनातलं सगळं बोलला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने पहिल्यांदाच त्याच्या पर्सनल लाईफबद्दल खुलून बोलला आहे. आयपीएल 2026 सुरू असतानाच अर्जुनने एक मुलाखत दिली आहे.
advertisement
1/9

अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या या मोसमाआधी मुंबई इंडियन्ससोबत होता. पण मुंबईकडून अर्जुनला खेळण्याची फार संधी मिळाली नाही. टीममध्ये जास्त स्पर्धा असल्यामुळे अर्जुनला टीममधलं त्याचं स्थान पक्कं करता आलं नाही.
advertisement
2/9
आयपीएल 2026 आधी अर्जुनला मुंबईने लखनऊसोबत ट्रेड केलं, त्यामुळे आता अर्जुन त्याच्या नव्या सुरूवातीसाठी सज्ज आहे. त्याआधी अर्जुनने एक मुलाखत दिली आहे, यात त्याने पर्सनल लाईफवरही भाष्य केलं आहे.
advertisement
3/9
कोणताही क्रिकेटपटू माझा मित्र नाही, मैदानाबाहेर माझं मित्र मंडळ मर्यादित आहे. माझे बहुतेक मित्र क्रिकेट खेळत नाहीत, तसंच मला जास्त लोकांसोबत मिसळण्याचा माझा स्वभाव नाही, असं अर्जुन तेंडुलकर म्हणाला.
advertisement
4/9
'माझं लक्ष्य फक्त क्रिकेट खेळणं आणि आपल्या खेळावर आहे. मी जास्त सोशल मीडियावर नसतो. आपली कामगिरी सुधारावी, याकडेच मी लक्ष देतो, त्यामुळे माझ्या मित्रांची संख्या खूप कमी आहे', असं उत्तर अर्जुन तेंडुलकरने दिलं.
advertisement
5/9
शांत राहण्यासाठी आपण एकदम खास पद्धत वापरतो. गोव्यामधल्या माझ्या घरामध्ये पाच कुत्रे आहेत, मी त्यांच्यासोबत वेळ घालवतो, त्यांच्यासोबत खेळतो, असं अर्जुन तेंडुलकर म्हणाला आहे.
advertisement
6/9
सोशल मीडियावरून होत असलेली टीका आणि वडिलांसोबतच्या तुलनेवरही अर्जुन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे. मला टीकेची भीती वाटत नाही, असं अर्जुन तेंडुलकर म्हणाला आहे.
advertisement
7/9
'तुलना होत राहते, मोठं नाव असणं एक आशिर्वाद आहे, पण यासोबत काही आव्हानंही येतात. मी क्रिकेट माझ्या आवडीसाठी खेळतो, कुणाला काही सिद्ध करण्यासाठी नाही. माझा फोकस फक्त मेहनत करणं आणि खेळ एन्जॉय करणं हाच आहे', असं उत्तर अर्जुनने दिलं.
advertisement
8/9
मुंबई इंडियन्सची साथ सोडण्यावरही अर्जुन तेंडुलकरने उत्तर दिलं आहे. अर्जुन तेंडुलकर आयपीएल 2021 मध्ये मुंबईच्या टीममध्ये आला, पण 2024 पर्यंत त्याला फक्त 5 मॅच खेळण्याची संधी मिळाली, यात त्याने 3 विकेट घेतल्या आणि 13 रन केल्या.
advertisement
9/9
मुंबईकडून जास्त संधी मिळायला पाहिजे होती का? असा प्रश्न अर्जुनला विचारण्यात आला. यावर असं कुणाला वाटणार नाही? कुणालाही बेंचवर बसायला आडवत नाही, पण आपल्याला मेहनत करावी लागते आणि संधी मिळेल तेव्हा चांगली कामगिरी करावी लागते, असं उत्तर अर्जुनने दिलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : 'क्रिकेटर माझे मित्र नाहीत...' अर्जुन तेंडुलकर भावुक झाला, मनातलं सगळं बोलला!