TRENDING:

DC vs LSG : बापूचा हा निर्णय पंतसाठी हानिकारक ठरला, एक ट्रम्पकार्ड काढला अन् लखनऊची टीम बघतच राहिली

Last Updated:
लखनऊ सूपर जाएटसचा प्रथम फलंदाजी करताना 141 धावा केल्या होत्या.या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने हा सामना 6 विकेट राखून जिंकला आहे.
advertisement
1/8
बापूचा हा निर्णय पंतसाठी हानिकारक ठरला, एक ट्रम्पकार्ड काढला अन् लखनऊची टीम बघतच राहिली
आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सने आज लखनऊ सूपर जाएटसचा 6 विकेट राखून पराभव केला आहे.दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा शिल्पकार हा समीर रिझ्वी आणि ट्रिस्टन स्टब्स ठरला आहे.
advertisement
2/8
लखनऊ सूपर जाएटसचा प्रथम फलंदाजी करताना 141 धावा केल्या होत्या.या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सने हा सामना 6 विकेटस आणि 8 बॉल राखून जिंकला आहे.
advertisement
3/8
लखनऊने दिलेल्या 141 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सूरूवात खराब झाली होती.कारण मोहम्मद शमीने पहिल्याच बॉलवर केएल राहुलला बाद केले होते.
advertisement
4/8
राहुल बाद झाल्यानंतर नितीश राणा मैदानात आला होता. पण चौथ्या ओव्हरमध्ये मोहसीन खानने नितीशला 15 धावांवर बाद केले होते.
advertisement
5/8
दरम्यान दोन विकेट पडल्यानंतर प्रिन्स यादवने दिल्ली कॅपिटल्सची आणखी खराब हालत केली. कारण प्रिन्सने पाचव्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर पथून निसांकाला 1 धावांवर बाद केले.त्यानंतर मैदानात आलेल्या कॅप्टन अक्षर पटेलला त्याने तिसऱ्याच बॉलवर डकवर आऊट करत माघारी धाडलं.अशाप्रकारे प्रिन्सने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या आहेत.
advertisement
6/8
झटपट 4 विकेट पडल्यानंतर असं वाटत होतं की लखनऊ मॅच हारते की काय, पण बापू अक्षर पटेलने ट्रम्प कार्ड बाहेर काढला आणि सामन्याचा निकाल बदलला आहे.
advertisement
7/8
अक्षर पटेलने इम्पॅक्ट प्लेअरचा नियम वापरू टी नटराजनच्या जागी समीर रिझ्वीला मैदानात उतरवलं आहे. रिझ्वी हा उत्तरप्रदेशचाच असल्याने त्याला या मैदानात खेळण्याचा अनुभव होता. याचाच फायदा घेऊन त्याने मैदानात 47 बॉलमध्ये 70 धावांची नाबाद मॅच विनिंग खेळी केली.त्याला यावेळी ट्रिस्टन स्टब्सने 39 धावांची मोलाची साथ दिली. या बळावर दिल्लीने हा सामना हा 6 विकेटने जिंकला होता.
advertisement
8/8
लखनऊ सुपर जाएटसकडून अब्दुल समदने सर्वाधिक 36 तर मिचेल मार्शने 35 धावांची खेळी केली होती. या धावांच्या बळावर लखनऊने 20 ओव्हरमध्ये 141 धावा केल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
DC vs LSG : बापूचा हा निर्णय पंतसाठी हानिकारक ठरला, एक ट्रम्पकार्ड काढला अन् लखनऊची टीम बघतच राहिली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल