TRENDING:

दोन वर्षांनंतर मुलगा परतला, पण यश पाहायला आईच नव्हती, IPL ची पहिली मेडन टाकणारा मोहसिन!

Last Updated:

दोन वर्षांनतंर आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या मोहसिन खानने या मोसमातली पहिली मेडन ओव्हर टाकली, पण मुलाचा हा ड्रीम कमबॅक पाहण्यासाठी त्याची आई नव्हती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लखनऊ : डावखुरा फास्ट बॉलर मोहसिन खान आयपीएल 2025 मध्ये एकही मॅच खेळू शकला नव्हता, गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर झाला होता, पण तरीही लखनऊ सुपर जाएंट्सने त्याला लिलावाआधी 4 कोटी रुपयांना रिटेन केलं. आयपीएल 2026 मध्ये लखनऊच्या पहिल्याच सामन्यात मोहसिनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली. 2024 नंतर मोहसिन पहिल्यांदाच प्रोफेशनल क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला.
दोन वर्षांनंतर मुलगा परतला, पण यश पाहायला आईच नव्हती, IPL ची पहिली मेडन टाकणारा मोहसिन!
दोन वर्षांनंतर मुलगा परतला, पण यश पाहायला आईच नव्हती, IPL ची पहिली मेडन टाकणारा मोहसिन!
advertisement

मोहसिनचा भेदक स्पेल

मोहसिन खानने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये नितीश राणाची विकेट घेतली. बॉलने नितीश राणाच्या बॅटची एज घेतली आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अब्दुल समदच्या हातात गेला, पण त्याचा पहिला प्रयत्न फसला अखेर दुसऱ्या प्रयत्नात समदने राणाचा कॅच घेऊन त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. राजस्थानकडून ट्रेडमध्ये दिल्लीत आलेल्या नितीश राणाने 17 बॉलमध्ये 15 रनची खेळी केली. मोहसिनने पहिल्या ओव्हरमध्ये एकही रन दिली नाही, यंदाच्या आयपीएलमधली ही पहिलीच मेडन ओव्हर होती.

advertisement

मोहसिनच्या आईचं निधन

मागची दोन वर्ष मोहसिन खान याच्यासाठी क्रिकेटसोबतच वैयक्तिक आयुष्यातही संघर्षाची होती. दुखापतीमुळे मोहसिन दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये कमबॅक करणार होता, पण हा ड्रीम कमबॅक पाहण्यासाठी मोहसिनची आई नव्हती. दोनच महिन्यांपूर्वी मोहसिन खानच्या आईचं निधन झालं. मोहसिनची आई खुशनुमा यांचं वयाच्या 62 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. मोहसिनच्या आईला शुगरचा त्रास होता, तसंच त्यांच्यावर गुडघ्याची शस्त्रक्रियाही झाली होती, पण शस्त्रक्रियेनंतर मोहसिनच्या आईची तब्येत बिघडली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.

advertisement

मोहसिन खानचं करिअर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाचे दर घसरले, कांद्याला भाव वाढ नाहीच, केळीची काय स्थिती?
सर्व पहा

मोहसिन खान हा आयपीएलचे अनेक सिझन मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. 2022 च्या लिलावात लखनऊने मोहसिनला विकत घेतलं आणि प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी दिली. यानंतर 9 सामन्यांमध्ये त्याने 6 पेक्षा कमीच्या इकोनॉमी रेटने 14 विकेट घेतल्या. पण उत्कृष्ट कामगिरीनंतर मोहसिनला दुखापतींचं ग्रहण लागलं. 2023 च्या मोसमात मोहसिन 5 आणि 2024 मध्ये 10 मॅच खेळू शकला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
दोन वर्षांनंतर मुलगा परतला, पण यश पाहायला आईच नव्हती, IPL ची पहिली मेडन टाकणारा मोहसिन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल