TRENDING:

Vaibhav Suryavanshi : त्याला तत्काळ टीम इंडियात घ्या, वैभव सूर्यवंशीसाठी पाकिस्तानातून मागणी, दिग्गद खेळाडू काय म्हणाला?

Last Updated:
वैभव सूर्यवंशीची क्रेझ पाकिस्तानमध्ये देखील असल्याचे समजते. कारण पाकिस्तानच्या एका दिग्गज खेळाडुने वैभव सूर्यवंशीला टीम इंडियातून खेळवण्याची मागणी केली आहे.
advertisement
1/9
त्याला तत्काळ टीम इंडियात घ्या, वैभव सूर्यवंशीसाठी पाकिस्तानातून मागणी, दिग्गद खेळाडू काय म्हणाला?
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने चेन्नई सूपर किंग्ज विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात 15 बॉलमध्ये वादळी अर्धशतक ठोकलं होतं.
advertisement
2/9
वैभव सूर्यवंशीच्या याच वादळी खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने 12.1 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठत 8 विकेटने सामना जिंकला होता. या विजयानंतर वैभव सूर्यवंशी चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता.
advertisement
3/9
वैभव सूर्यवंशीची ही फलंदाजी पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन देखील प्रभावीत झाला होता आणि त्याने काही महिन्यांनी इंग्लंडचा व्हाईट बॉलचा दौरा येणार आहे. जर मी भारतीय क्रिकेटच्या निवड समीतीत असतो तर मी वैभवला नक्कीच त्या दौऱ्यावर नेलं असतं, असे मायकल वॉन म्हणाला होता.
advertisement
4/9
मायकल वॉनच्या याच विधानाला जोडून टीम इंडियाचा दिग्गज स्पिनर रविचंद्रन अश्विनने मोठं विधान केलं आहे. वैभवला त्याचा वेळ दिला पाहिजे, त्याच्यावर दबाव टाकून घाईघाई केली नाही पाहिजे, असे म्हणत एकप्रकारे अश्विनने विरोध केला होता.
advertisement
5/9
या विरोधानंतर आता पाकिस्तानच्या कामरान अकमलने वैभव सूर्यवंशीला टीम इंडियातून खेळवले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.यावरून वैभव सूर्यवंशीची क्रेझ पाकिस्तानमध्ये देखील असल्याचे समजते.
advertisement
6/9
वैभव सूर्यवंशीची ही फक्त सूरूवात आहे. पण तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आधीच तयार आहे आणि तो लवकरच भारतासाठी प्रतिनिधित्व करू शकतो,असे पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटून कामरान अकमल म्हणाला आहे.
advertisement
7/9
वैभवने 8 आयपीएल सामन्यांमध्येच विक्रमाची नोंद केली आहे.त्याच्या नावावर आधीच शतक आहे. त्यामुळे मला वाटते आयपीएलनंतर भारतासाठी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्याला संधी मिळेल,असे कामरान अकमलला वाटते.
advertisement
8/9
वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय संघाचा एक युवा खेळाडू बनेल. त्याने प्रत्येक ठिकाणी स्वत:ला सिद्ध केले आहे. जर त्याने अशीच कामगिरी सूरू ठेवली तर त्याला नक्कीच संधी मिळेल,असे देखील कामरान अकमल म्हणाला आहे.
advertisement
9/9
मला भीती वाटते की जेव्हा तो 25 वर्षांचा होईल,तेव्हा गोलंदाजांना त्याच्याविरूद्ध काय करावे, हेच कळणार नाही,अशी भीती देखील कामरान अकमलने गोलंदाजांना घातली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : त्याला तत्काळ टीम इंडियात घ्या, वैभव सूर्यवंशीसाठी पाकिस्तानातून मागणी, दिग्गद खेळाडू काय म्हणाला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल