TRENDING:

तटकरे-पटेल बाजूला? राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष? सुनेत्रा पवारांच्या डावपेचांना सुरुवात

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या प्रचंड अंतर्गत उलथापालथ आणि वेगवान घडामोडी सुरू आहेत. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदाचा उल्लेख नसल्यानं खळबळ उडालीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसात सुंदोपसुंदीची चर्चा होती. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला 10 मार्च रोजी लिहिलेलं पत्र समोर आलंय. त्यामुळं या चर्चांना अधिकच बळ मिळालंय. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदाचा उल्लेख करण्यात आला नाही.
सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार
advertisement

मात्र या पत्रामध्ये अध्यक्ष म्हणून स्वत:च्या अध्यक्षपदाचा पदाचा उल्लेख केल्याचं समोर आलंय. या पत्रात शिवाजीराव गर्जेंचा खजिनदार म्हणून उल्लेख केला आहे. 10 मार्चला दिलेल्या पत्रानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीये. 26 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याचवेळी हे ठराव पारित करण्यात आले.

तो पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, सुनेत्रा पवारांचे पत्र

advertisement

दरम्यान, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी पक्षाच्या घटनेत बदल करून पक्षाचे सर्व अधिकार कार्याध्यक्ष प्रफुल पटेलांना देण्यात आल्याचे पत्र निवडणूक आयोगाला 16 फेब्रुवारीला पाठवल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. तर 28 जानेवारी अजित पवारांचा झालेला अपघात ते सुनेत्रा पवारांनी 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीच्या कालावधीदरम्यान पक्षाकडून जो पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडे करण्यात आला , तो ग्राह्य धरू नये असे सुनेत्रा पवारांनी 10 मार्चला पाठवलेल्या पत्रात नमूद केल्याचा दावा रोहित पवारांनी केला होता. आता सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलंय.

advertisement

पत्रात काय म्हटलंय?

सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रामध्ये फक्त स्वतःच्या पदापुढे राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. तसेच खजीनदार म्हणून विश्वासू आणि निकटवर्तीय सहकारी शिवाजीराव गर्जे यांचा उल्लेख केला आहे. पत्रात तटकरे-पटेल यांच्याशिवाय छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, शेखर निकम, सुबोध मोहिते, सरोज अहिरे, जय पवार, धीरज शर्मा यांचीही नावे आहेत.

advertisement

राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्षाला सुरुवात?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाचे दर घसरले, कांद्याला भाव वाढ नाहीच, केळीची काय स्थिती?
सर्व पहा

अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे सुनील तटकरे यांचा प्रदेशाध्यक्ष तथा प्रफुल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेख टाळला. सुनेत्रा पवार यांचे हे पाऊल म्हणजेच राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्षाला सुरुवात झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तटकरे-पटेल बाजूला? राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष? सुनेत्रा पवारांच्या डावपेचांना सुरुवात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल