TRENDING:

3,00,000 पुऱ्या, 5 पिंप गुळवणी अन् 500 किलो कांद्याच्या चटणी, गावकऱ्यांनी तयार केला जम्बो महाप्रसाद, PHOTOS

Last Updated:
आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे इथं हनुमान जयंतीला महाप्रसाद म्हणून वाटप करण्यासाठी थोरांदळे ग्रामस्थांनी आजच तीन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी अन् पाचशे किलो कांद्याची चटणी तयार केली. (सचिन तोडकर, प्रतिनिधी)
advertisement
1/7
3,00,000 पुऱ्या, 5 पिंप गुळवणी अन् 500 किलो कांद्याच्या चटणी, गावकऱ्यांनी तयार केला जम्बो महाप्रसाद, PHOTOS
आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे इथं गुरुवारी संपन्न होणाऱ्या हनुमान जयंतीला महाप्रसाद म्हणून वाटप करण्यासाठी थोरांदळे ग्रामस्थांनी आजच तीन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी अन् पाचशे किलो कांद्याची चटणी तयार केली. या गावातील हनुमान जयंतीच्या दिवशीचा "पुरी-गुळवणीचा" महाप्रसाद राज्यात प्रसिद्ध असून या महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी राज्यभरातून भाविक येथे येत असतात.
advertisement
2/7
हनुमान जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे आजच थोरांदळे गावातील पुरुष, महिला, जेष्ठ मंडळींनी एकत्र येऊन हा महाप्रसाद तयार केलाय.
advertisement
3/7
गावातील हनुमान मंदिराच्या समोरच्या प्रांगणात महिलांनी दिवसभर पुऱ्या लाटण्याचे काम केलं तर पुरुष मंडळींनी या पुऱ्या तळण्याचे काम केलंय.
advertisement
4/7
थोरांदळे ग्रामस्थांनी यंदा जवळपास तीन लाखाहून अधिक पुऱ्या, पाच पिंप गुळवणी आणि पाचशे किलो कांद्याची चटणी असा महाप्रसाद आज तयार केला आहे.
advertisement
5/7
गुरुवारी सकाळी हनुमान जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविक, भक्त, ग्रामस्थ व पै-पाहुण्यांना या पुऱ्या गुळवणीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
advertisement
6/7
दरवर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने पुऱ्या गुळवणीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असतो. यंदाही ही परंपरा कायम आहे.
advertisement
7/7
विशेष म्हणजे, थोरांदळे गावातील पुरुष, महिला, जेष्ठ मंडळींनी हा महाप्रसाद तयार करण्यासाठी एकत्र येतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
3,00,000 पुऱ्या, 5 पिंप गुळवणी अन् 500 किलो कांद्याच्या चटणी, गावकऱ्यांनी तयार केला जम्बो महाप्रसाद, PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल