Buldhana: चिखला गावात संजीवनी वाघ यांचे कपडे कोणी फाडले? दोन समाजात तणाव, धक्कादायक Video समोर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा बसवल्याचे प्रकरणाची राज्यात चर्चा आहे.
advertisement
1/5

राहुल खंडारे, प्रतिनिधी, बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा बसवल्याचे प्रकरणाची राज्यात चर्चा आहे.
advertisement
2/5
हा वाद गेल्या चार दिवसांपासून सुरू असून आता गावात संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
advertisement
3/5
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात चिखला गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून उद्भवलेल्या वादात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांचे कपडे फाडल्यानंतर संपूर्ण राज्यभरात संताप व्यक्त केला जात होता. हे प्रकरण चांगलंच तापले होते. उद्धव ठाकरे यांनीही गावकऱ्यांना फोन करून आरोपींवर कारवाई होईल, अशी ग्वाही दिली
advertisement
4/5
मात्र या प्रकरणात एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडिओतून दावा करण्यात येत आहे की संजीवनी वाघ यांचे कपडे त्यांचीच वहिनी फाडत आहे. या व्हिडीओची पुष्टी न्यूज १८ मराठी करीत नाही.
advertisement
5/5
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मात्र पोलिसांनी आता या प्रकरणात चौकशी करून आरोपींवर कारवाई करू, अशी भूमिका घेतली आहे. व्हिडीओवर बोलण्यास त्यांनी नकार दिला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Buldhana: चिखला गावात संजीवनी वाघ यांचे कपडे कोणी फाडले? दोन समाजात तणाव, धक्कादायक Video समोर