Bollywood Movie: ॲक्शन- थ्रिलर अन् बरंच काही... 'हे' 7 सुपरहिट चित्रपट पाहिलेत का? नसतील पाहिले तर आत्ताच ओटीटीवर पाहा
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Superhit Bollywood Movie: बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या चित्रपटांची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. हिंदी भाषेमध्ये 500 कोटींहून अधिकची कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी आज आपण पाहणार आहोत. या यादीमध्ये शाहरूख खान, विकी कौशल, रणवीर सिंग आणि सनी देओल यांच्या चित्रपटाचा समावेश आहे.
advertisement
1/9

बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या चित्रपटांची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते. हिंदी भाषेमध्ये 500 कोटींहून अधिकची कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी आज आपण पाहणार आहोत. या यादीमध्ये शाहरूख खान, विकी कौशल, रणवीर सिंग आणि सनी देओल यांच्या चित्रपटाचा समावेश आहे.
advertisement
2/9
सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या टॉप 7 च्या यादीमध्ये कोणकोणत्या चित्रपटांचा समावेश आहे, एकदा नजर टाकूया. जर तुम्ही ते चित्रपट अजूनही पाहिले नसतील तर आवर्जुन ओटीटीवर पाहा.
advertisement
3/9
या यादीमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला रणवीर सिंगचा 'धुरंदर' चित्रपट आहे. या चित्रपटाने फक्त देशातच नाही तर जगभरात आपली जादू दाखवली आहे. हिंदी भाषेमध्ये या चित्रपटाने 838.5 कोटींची कमाई केली असून जगभरामध्ये, 1300 कोटींहून अधिकची कमाई केलीये.
advertisement
4/9
'पुष्पाः द रूल पार्ट 2' चित्रपटानेही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. हिंदीसह पाच भाषांमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाने जगभरातही आपली क्रेझ निर्माण केली. हिंदी भाषेमध्ये 'पुष्पा 2'ने 812.14 कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे.
advertisement
5/9
श्रद्धा कपूर- राजकुमार रावच्या 'स्त्री 2' चित्रपटाने हिंदीमध्ये 598 कोटींची कमाई केली आहे. या हॉरर कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला आहे.
advertisement
6/9
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना स्टारर 'छावा' चित्रपटाने हिंदी भाषेमध्ये बॉक्स ऑफिसवर 585.7 कोटी रुपयांची कमाई केली. विकी कौशल, अक्षय खन्नासह विनीत कुमार सिंगच्या अभिनयाचेही सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले.
advertisement
7/9
शाहरुख खानच्या ॲटली दिग्दर्शित 'जवान' चित्रपटात शाहरुखसोबत नयनताराने काम केले होते. या चित्रपटाने जगभरात 1100 कोटींची कमाई केली असून हिंदीमध्ये 582.31 कोटींची कमाई केलेली आहे.
advertisement
8/9
सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाने हिंदीमध्ये बॉक्स ऑफिसवर 525.7 कोटींची कमाई केली आहे. तब्बल 22 वर्षांनी आलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी भरभरून गर्दी केली होती.
advertisement
9/9
शाहरुख खानने 'पठान' चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर जबरदस्त कमबॅक केलं आहे. या चित्रपटाने अनेक कमाईचे रेकॉर्ड तोडले आणि शाहरुख खानचे गमावलेले स्टारडम परत मिळवले. हिंदी भाषेतील चित्रपटाने 524.53 कोटींची कमाई केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bollywood Movie: ॲक्शन- थ्रिलर अन् बरंच काही... 'हे' 7 सुपरहिट चित्रपट पाहिलेत का? नसतील पाहिले तर आत्ताच ओटीटीवर पाहा