TRENDING:

यंदाच्या होलिका दहनात चंद्रग्रहणाचा मोठा अडथळा? ज्योतिषाचार्यांनी थेटच सांगितलं सगळं

Last Updated:
यंदा पंचांगानुसार होळी 2 मार्चला साजरी केली जाणार आहे तर धुलिवंदन हे 3 मार्चला साजर केलं जाईल. पण काही कारणांमुळे होलिका दहन आणि धुळवड नेमकं कधी साजरी केली जाणार याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.
advertisement
1/7
यंदाच्या होलिका दहनात चंद्रग्रहणाचा मोठा अडथळा? ज्योतिषाचार्यांनी थेटच सांगितलं
यंदा पंचांगानुसार होळी 2 मार्चला साजरी केली जाणार आहे तर धुलिवंदन हे 3 मार्चला साजर केलं जाईल. पण काही कारणांमुळे होलिका दहन आणि धुळवड नेमकं कधी साजरी केली जाणार याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.
advertisement
2/7
होळीदरम्यान प्रदोष काळ आणि चंद्रग्रहण असल्याने हा उत्सव नेमका कधी साजरा करावा, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, शहरातील ज्योतिषाचार्याांच्या मते, होळी उत्सव 2 आणि 3 मार्चला साजरा करावा. 2 मार्चला सोमवारी होलिकादहन तर मंगळवारी 3 मार्चला धूलिवंदनाचे रंग खेळता येणार आहेत.
advertisement
3/7
प्रसिद्ध ज्योतिषाचार्य, अनंत पांडव गुरुजी यांनी एका वृत्तपत्राला माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी 6 ते रात्री 8:42 पर्यंत होलिकादहनाचा मुहूर्त आहे. यादरम्यान गोवऱ्यांवर पेटवलेल्या होळीमध्ये पुरणावरणाचा नैवेद्य वाहावा. यंदा 3 मार्चला चंद्रग्रहणही आहे. हे या उत्सवाचे वेगळेपण आहे.
advertisement
4/7
अनंत पांडव गुरुजींच्या मते, 2 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजून 56 मिनिटांनी पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार आहे. ही पौर्णिमा मंगळवारी 3 मार्चपर्यंत सायंकाळी 6:50 मिनिटांपर्यंत राहणार आहे. त्यामुळे होलिकादहन 2 मार्चला सायंकाळी करणे योग्य आहे.
advertisement
5/7
2 मार्च 2026 रोजी प्रदोष काळी पौर्णिमा तिथी उपलब्ध आहे. जरी 3 मार्चलाही पौर्णिमा असली, तरी ती सकाळी लवकर संपत आहे. शास्त्रानुसार, ज्या रात्री पौर्णिमा प्रदोष व्यापिनी असते, त्याच रात्री होळी पेटवणे शुभ मानले जाते.
advertisement
6/7
3 मार्च रोजी चंद्रग्रहण लागणार आहे. शास्त्रानुसार ग्रहणाच्या सूतक काळात किंवा ग्रहण काळात शुभ कार्ये किंवा अग्नी प्रज्वलन टाळले जाते. त्यामुळे ग्रहणाचा कोणताही अडथळा येऊ नये आणि धार्मिक विधी शुद्धपणे पार पडावेत, यासाठी 2 मार्चची रात्र होळी दहनासाठी सर्वोत्तम ठरवण्यात आली आहे.
advertisement
7/7
होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशी 'धुळवड' किंवा 'रंगोत्सव' साजरा केला जातो. 2 मार्चच्या रात्री होळी दहन झाल्यानंतर, 3 मार्च 2026, मंगळवार रोजी धुळवड साजरी केली जाईल. जरी या दिवशी ग्रहण असले, तरी धुळवडीचा आनंद घेण्यास शास्त्राने मनाई केलेली नाही. फक्त ग्रहणाच्या वेळेत देवपूजा किंवा नैवेद्य टाळून सामान्य रंगांचा उत्सव साजरा करता येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
यंदाच्या होलिका दहनात चंद्रग्रहणाचा मोठा अडथळा? ज्योतिषाचार्यांनी थेटच सांगितलं सगळं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल