Team India : सूर्याला ओव्हर कॉन्फिडन्स नडला! ड्रेसिंग रूमचा प्लान धुडकावला अन् टीम इंडियाचा घात झाला
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा धक्का बसला. यानंतर टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचणंही कठीण होऊन बसलं आहे, पण आता टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधून धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत.
advertisement
1/8

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-8 सामन्यामध्ये टीम इंडियाचा 76 रननी पराभव झाला. या पराभवामुळे भारताचा नेट रनरेट मायनस 3.800 झाला आहे, त्यामुळे आता सेमी फायनलला क्वालिफाय होण्यासाठी टीम इंडियाला दुसऱ्या टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.
advertisement
2/8
4 ओव्हरमध्ये 20 रनवरच दक्षिण आफ्रिकेच्या 3 विकेट गेल्या होत्या, पण त्यानंतर टीम इंडियाची रणनीती पूर्णपणे अपयशी ठरली. मिलर, ब्रेविस आणि स्टब्स यांच्या आक्रमणामुळे दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 187 रन केले. याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा 111 रनवर ऑलआऊट झाला.
advertisement
3/8
अक्षर पटेलऐवजी वॉशिंग्टन सुंदरला खेळवणं, शेवटच्या ओव्हरआधीच बुमराह-अर्शदीपचा स्पेल संपवणं आणि 20 वी ओव्हर हार्दिक पांड्याला देणं टीम इंडियाला चांगलंच महागात पडलं. याशिवाय अभिषेक शर्मा आणि तिलक वर्माचं सातत्यपूर्ण अपयशही पराभवाला कारणीभूत ठरलं.
advertisement
4/8
टीम इंडियाच्या या पराभवानंतर बॅटिंग कोच सितांशू कोटक यांनी धक्कादायक दावे केले आहेत, त्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये ठरलेली रणनीती मैदानात वापरली गेली नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
advertisement
5/8
दक्षिण आफ्रिकेकडे 3 डावखुरे बॅटर आहेत, त्यामुळे ऑफ स्पिनर गरजेचा आहे, असं आम्हाला वाटलं, त्यामुळे सुंदरला संधी मिळाली. वॉशिंग्टन सुंदरने पॉवर प्लेमध्ये बॉलिंग केली नाही, पण तो पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करणार होता, असं सितांशू कोटक म्हणाले आहेत.
advertisement
6/8
वॉशिंग्टन सुंदर पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करणार होता, असं बॅटिंग कोच म्हणाले, पण प्रत्यक्षात मात्र कर्णधार सूर्यकुमार यादवने पॉवर प्ले मध्ये वरुण चक्रवर्तीला इनिंगची पाचवी ओव्हर दिली, ज्यात त्याने 11 रन दिले.
advertisement
7/8
पॉवर प्ले संपल्यानंतर लगेचच म्हणजेच 7 वी ओव्हर सूर्यकुमार यादवने सुंदरला बॉलिंग दिली, ज्यात त्याने 11 रन दिल्या. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये सुंदरच्या बॉलिंगवर 6 रन आल्या.
advertisement
8/8
हार्दिक पांड्याच्या 4 ओव्हरमध्ये 45, वरुण चक्रवर्तीच्या 4 ओव्हरमध्ये 47 आणि शिवम दुबेच्या 2 ओव्हरमध्ये 32 रन आल्या. या तुलनेत सुंदरने त्याच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 17 रन दिल्या, पण तरीही सूर्याने त्याला पुढे बॉलिंगच दिली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : सूर्याला ओव्हर कॉन्फिडन्स नडला! ड्रेसिंग रूमचा प्लान धुडकावला अन् टीम इंडियाचा घात झाला