TRENDING:

'आता मला नाटक करावं लागत नाही', राज निदिमोरूसोबतच्या लग्नावर पहिल्यांदाच बोलली समांथा प्रभू, मनातलं सगळंच सांगितलं

Last Updated:
Samanatha Ruth Prabhu: लोकप्रिय दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर सामंथाने पहिल्यांदाच आपल्या हिलिंग प्रवासावर आणि नवीन नात्यावर भाष्य केलं आहे.
advertisement
1/6
'आता मला नाटक करावं लागत नाही', राजसोबतच्या लग्नावर पहिल्यांदाच बोलली समांथा
दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिच्या आयुष्यात गेल्या काही वर्षांत वादळामागून अनेक वादळं आली. नागा चैतन्यसोबतचा घटस्फोट असो वा गंभीर आजारपण, सामंथाने प्रत्येक संकटाचा सामना धैर्याने केला.
advertisement
2/6
पण आता सामंथाच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद आला आहे. लोकप्रिय दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर सामंथाने पहिल्यांदाच आपल्या हिलिंग प्रवासावर आणि नवीन नात्यावर भाष्य केलं आहे. 'व्होग इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सामंथाने तिच्या आयुष्यातील कठीण काळाची आठवण सांगितली.
advertisement
3/6
ती म्हणाली, "२०२१ मध्ये जेव्हा माझं लग्न मोडलं, तेव्हा मी पूर्णपणे कोलमडून गेले होते. मी स्वतःला एका कोशात बंद करून घेतलं होतं. मला वाटलं नव्हतं की मी पुन्हा कधी कोणावर विश्वास ठेवू शकेन किंवा कोणाच्या आधाराने उभी राहू शकेन. पण राज माझ्या आयुष्यात आला आणि सगळं बदललं."
advertisement
4/6
राज निदिमोरू आणि सामंथा यांची ओळख 'द फॅमिली मॅन २' च्या सेटवर झाली होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि १ डिसेंबर २०२५ रोजी तामिळनाडूतील ईशा फाऊंडेशनमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांनी लग्नगाठ बांधली.
advertisement
5/6
घटस्फोटानंतरच्या काळात सामंथाला सतत लोकांच्या नजरांना आणि प्रश्नांना सामोरं जावं लागलं. त्या दबावाबद्दल तिने सांगितलं, "माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने मला नुकताच एक व्हॉईस मेसेज पाठवला. ती म्हणाली, 'सॅम, अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच मला असं जाणवतंय की तुला श्वास घेण्यासाठी संघर्ष करावा लागत नाहीये.' हे ऐकून मलाही जाणीव झाली की, आता मला सुखी असल्याचं नाटक करावं लागत नाहीये. मी खरोखर आनंदी आहे."
advertisement
6/6
एकीकडे वैयक्तिक आयुष्यात स्थिरावलेली सामंथा आता पडद्यावरही आग लावण्यास सज्ज आहे. तिचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'माँ इंती बंगाराम' (Maa Inti Bangaram) येत्या १५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाकडून सामंथाला आणि तिच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आता मला नाटक करावं लागत नाही', राज निदिमोरूसोबतच्या लग्नावर पहिल्यांदाच बोलली समांथा प्रभू, मनातलं सगळंच सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल