T20 World Cup : झिम्बाब्वेच्या पराभवाने बिघडलं सेमी फायनलचं गणित, टीम इंडियाला 24 तासात दुसरा धक्का!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा दारूण पराभव केला आहे, पण या पराभवाचा धक्का टीम इंडियाला बसला आहे. वेस्ट इंडिजच्या विजयामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलचं समीकरण आणखी कठीण झालं आहे.
advertisement
1/7

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने पहिले बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 254 रनचा डोंगर उभारला. हेटमायरने 34 बॉलमध्ये 85 आणि पॉवेलने 35 बॉलमध्ये 59 रनची खेळी केली.
advertisement
2/7
वेस्ट इंडिजने दिलेल्या 255 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा 147 रनवर ऑलआऊट झाल्यामुळे त्यांचा 107 रननी पराभव झाला आहे. झिम्बाब्वेचा हा पराभव मात्र टीम इंडियासाठी आणखी अडचणीचा ठरणार आहे.
advertisement
3/7
झिम्बाब्वेविरुद्ध 107 रननी विजय मिळवल्यामुळे वेस्ट इंडिजच्या नेट रनरेटला बुस्टर डोस मिळाला आहे. ग्रुप 1 मध्ये असलेल्या वेस्ट इंडिजचा नेट रनरेट हा +5.350 एवढा झाला आहे, याचसोबत वेस्ट इंडिज ग्रुप 1 मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.
advertisement
4/7
रविवारी दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 76 रननी पराभव केला, त्यामुळे त्यांचा नेट रनरेट +3.800 झाला आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा नेट रनरेट हा मायनस 3.800 आहे. ग्रुप 1 मधून दोन टीम सेमी फायनलमध्ये जाणार आहेत, त्यातच दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचा नेट रनरेट इतका जास्त आहे.
advertisement
5/7
टीम इंडियाने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवला. वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं आणि दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेवर विजय मिळवला तर भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचे प्रत्येकी 4-4 पॉईंट्स होतील, या परिस्थितीमध्ये ज्या दोन टीमचा नेट रनरेट चांगला असेल त्या टीम सेमी फायनलमध्ये जातील.
advertisement
6/7
टीम इंडियाला त्यांचा नेट रनरेट सुधारण्यासाठी झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये पहिले बॅटिंग घेऊन मोठा स्कोअर उभारावा लागेल आणि विरोधी टीमला स्वस्तात ऑलआऊट करावं लागेल, तरंच टीम इंडिया नेट रनरेटवर सेमी फायनलला पोहोचेल.
advertisement
7/7
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकले आणि भारतानेही दोन्ही सामन्यात विजय मिळवला तरीदेखील टीम इंडिया सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल, त्यामुळे आता टीम इंडियाचं भवितव्य दक्षिण आफ्रिकेवरच अवलंबून असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : झिम्बाब्वेच्या पराभवाने बिघडलं सेमी फायनलचं गणित, टीम इंडियाला 24 तासात दुसरा धक्का!