Team India : गंभीरचा 'खौफ'... हार्दिक-गिलनंतर तिसऱ्याचा 'बळी', वर्ल्ड कपमध्येच टीम इंडियात उलथापालथ!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाला पहिल्या पराभवाचा धक्का बसला आहे, पण सेमी फायनलची रेस सुरू असताना झालेला हा पराभव टीम इंडियाला जिव्हारी लागणारा आहे.
advertisement
1/8

सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यामध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 रननी पराभव झाला आहे. एवढ्या मोठ्या पराभवामुळे टीम इंडियासमोर सेमी फायनलला पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पराभवानंतर टीम इंडियाचा नेट रनरेट मायनस 3.800 झाला आहे.
advertisement
2/8
सेमी फायनलला पोहोचायचं असेल तर आता टीम इंडियाला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियाने या दोन्ही टीमचा पराभव केला तर भारत सेमी फायनलला पोहोचेल.
advertisement
3/8
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या सामन्यासाठी केलेल्या टीम सिल्केशनवरही चौफेर टीका केली जात आहे. या महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियाने अक्षर पटेलऐवजी वॉशिंग्टन सुंदरवर विश्वास दाखवला.
advertisement
4/8
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची निवड झाली तेव्हा अक्षर पटेलला उपकर्णधार केलं गेलं, पण उपकर्णधारालाच टीममधून बाहेर ठेवण्याचा निर्णय टीम इंडियाने घेतला, जो शेवटी त्यांनाच महागात पडला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात टॉसवेळीही कर्णधार सूर्यकुमार यादवने अक्षर पटेलबद्दल कठोर निर्णय घ्यावा लागल्याचं मान्य केलं होतं.
advertisement
5/8
अक्षर पटेलने या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 3 सामन्यांमध्ये 6 विकेट घेतल्या आहेत. 2024 टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्येही अक्षरने मॅच विनिंग खेळी केली होती, पण तरीही त्याला टीमबाहेर ठेवलं गेलं. दक्षिण आफ्रिकेकडे डावखुरे बॅटर जास्त असल्यामुळे अक्षरला टीमबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला होता.
advertisement
6/8
2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाने 3 उपकर्णधार बदलले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा हार्दिक पांड्या उपकर्णधार होता. रोहितने निवृत्ती घेतल्यानंतर हार्दिक कॅप्टन्सीच्या रेसमध्ये होता, तसंच त्याला आयपीएलमध्येही कर्णधारपदाचा अनुभव होता, पण त्याच्याऐवजी सूर्याला कॅप्टन करण्यात आलं.
advertisement
7/8
सूर्याला कॅप्टन केल्यानंतर हार्दिक पांड्याला उपकर्णधारपदावरून हटवण्यात आलं आणि शुभमन गिलला ही जबाबदारी दिली गेली. पण टी-20 वर्ल्ड कपच्या तोंडावर गिलला टीमबाहेर करून परत अक्षर पटेलकडे उपकर्णधारपद दिलं गेलं.
advertisement
8/8
2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक झाला. तेव्हापासून टीम इंडियाने तीन खेळाडूंना उपकर्णधारपदावरून बाजूला केलं आहे. टीम इंडियाच्या या रणनीतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : गंभीरचा 'खौफ'... हार्दिक-गिलनंतर तिसऱ्याचा 'बळी', वर्ल्ड कपमध्येच टीम इंडियात उलथापालथ!