TRENDING:

T20 World Cup : 6,6,6,6,6,6,6... वानखेडेवर हेटमायरचं वादळ, 250 च्या स्ट्राईक रेटने झिम्बाब्वेची धुळधाण

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यामध्ये वेस्ट इंडिजच्या शिमरन हेटमायरने झिम्बाब्वेविरुद्ध वादळी खेळी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 सामन्यामध्ये वेस्ट इंडिजच्या शिमरन हेटमायरने झिम्बाब्वेविरुद्ध वादळी खेळी केली आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर त्यांनी वेस्ट इंडिजचा ओपनर ब्रॅन्डन किंग याला 9 रनवरच आऊट केलं, पण किंगची विकेट गेल्यानंतर हेटमायर झिम्बाब्वेच्या बॉलिंगवर तुटून पडला. हेटमायरने 34 बॉलमध्ये 250 च्या स्ट्राईक रेटने 85 रनची वादळी खेळी केली. हेटमायरच्या या खेळीमध्ये 7 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता.
6,6,6,6,6,6,6... वानखेडेवर हेटमायरचं वादळ, 250 च्या स्ट्राईक रेटने झिम्बाब्वेची धुळधाण
6,6,6,6,6,6,6... वानखेडेवर हेटमायरचं वादळ, 250 च्या स्ट्राईक रेटने झिम्बाब्वेची धुळधाण
advertisement

शिमरन हेटमायरने त्याच्या इनिंगमधली एक सिक्स तब्बल 108 मीटर लांब मारली. 19 बॉलमध्येच हेटमायरने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातली वेस्ट इंडिजच्या खेळाडूचं हे सगळ्यात जलद अर्धशतक होतं. याआधी याच टी-20 वर्ल्ड कपमध्ये शेमरन हेटमायरनेच स्कॉटलंडविरुद्ध 22 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. हेटमायरने या सामन्यात धमाका केला असला तरी त्याला दोन जीवनदान मिळाली. दोन्ही वेळा मुसेकिवाने हेटमायरचा कॅच सोडला.

advertisement

हेटमायर आणि रोव्हमन पॉवेल यांच्यामध्ये तिसऱ्या विकेटसाठी 122 रनची पार्टनरशीप झाली. रोव्हमन पॉवेलने 29 बॉलमध्ये त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. 35 बॉलमध्ये 59 रन करून पॉवेल पॅव्हेलियनमध्ये परतला. पॉवेलने त्याच्या या खेळीमध्ये 4 फोर आणि 4 सिक्स मारल्या. हेटमायर आणि पॉवेलची विकेट गेल्यानंतरही वेस्ट इंडिजने आक्रमक बॅटिंग सुरूच ठेवली. शरफेन रदरफोर्डने 13 बॉलमध्ये 31, रोमारियो शेफर्डने 10 बॉल 21 आणि जेसन होल्डरने 4 बॉल 13 रन केले, त्यामुळे वेस्ट इंडिजने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 254 रनचा डोंगर उभारला. झिम्बाब्वेकडून नगारवा, मुझरबानीला 2-2 आणि इव्हान-क्रीमर यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबला 13000 रुपये भाव, आल्याचे दरही सुधारले, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

सुपर-8 मधला वेस्ट इंडिजचा हा पहिलाच सामना आहे. पहिल्याच सामन्यातून वेस्ट इंडिजने त्यांचे इरादे स्पष्ट केले आहेत. सुपर-8 च्या 3 सामन्यांमध्ये 3 विजय मिळवणारी टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. वेस्ट इंडिजच्या ग्रुपमध्ये टीम इंडिया, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका आहेत. या ग्रुपमधून टॉप-2 टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय होतील.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 6,6,6,6,6,6,6... वानखेडेवर हेटमायरचं वादळ, 250 च्या स्ट्राईक रेटने झिम्बाब्वेची धुळधाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल