TRENDING:

उन्हाळ्यामध्ये शेतात काम करत असतांना ट्रॅक्टर इंजिन जास्त गरम होत असल्यास काय करावं?

Last Updated:
Tractor News : ट्रॅक्टर हे शेतकऱ्याचे सर्वात विश्वासार्ह साधन मानले जाते. मात्र ट्रॅक्टर सतत जास्त गरम होत असूनही जर त्याकडे दुर्लक्ष केले, तर ही चूक इंजिनचे आयुष्य तब्बल पाच वर्षांनी कमी करू शकते.
advertisement
1/6
उन्हाळ्यामध्ये शेतात काम करत असतांना ट्रॅक्टर इंजिन गरम होत असल्यास काय करावं?
मुंबई : ट्रॅक्टर हे शेतकऱ्याचे सर्वात विश्वासार्ह साधन मानले जाते. मात्र ट्रॅक्टर सतत जास्त गरम होत असूनही जर त्याकडे दुर्लक्ष केले, तर ही चूक इंजिनचे आयुष्य तब्बल पाच वर्षांनी कमी करू शकते. अनेक वेळा शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. पण हीच सवय पुढे मोठ्या खर्चाला आणि इंजिनच्या गंभीर बिघाडाला कारणीभूत ठरते. ट्रॅक्टरचे इंजिन जास्त गरम होण्यामागे एकच नव्हे तर अनेक कारणे असतात. योग्य वेळी काळजी न घेतल्यास संपूर्ण इंजिन निकामी होण्याचा धोका वाढतो.अशावेळेस काय काळजी घ्यावी? हेच आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
2/6
ट्रॅक्टरचे इंजिन जास्त गरम का होते? -  डिझेल किंवा पेट्रोल इंजिनमध्ये इंधन जळल्यानंतर निर्माण होणाऱ्या ऊर्जेपैकी सुमारे ६० ते ७० टक्के ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात निघून जाते, तर केवळ ३० ते ४० टक्के ऊर्जा प्रत्यक्ष कामासाठी वापरली जाते. ही उष्णता नियंत्रित न झाल्यास इंजिनचे तापमान झपाट्याने वाढते. ट्रॅक्टरचे इंजिन अत्यंत शक्तिशाली असले तरी त्याची एक निश्चित कार्यक्षमता असते. क्षमतेपेक्षा जास्त भार दिल्यास इंजिनवर ताण वाढतो. ओव्हरलोड स्थितीत ट्रॅक्टर दीर्घकाळ चालवल्यास इंजिन गरम होणे, तेल जळणे आणि आतील भाग झिजणे अशा समस्या निर्माण होतात.
advertisement
3/6
जास्त गरम होणे टाळण्यासाठी काय करावे? -  इंजिन निरोगी ठेवण्यासाठी नियमित सर्व्हिसिंग हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. वेळेवर सर्व्हिस केल्यास अनेक समस्या आधीच टळतात. जर नियमित सर्व्हिसिंग शक्य नसेल, तरी दर ३०० तासांच्या वापरानंतर इंजिन ऑइल बदलणे अत्यावश्यक आहे. जुनं तेल वापरल्यास इंजिनमधील घर्षण वाढते आणि उष्णता अधिक निर्माण होते. ऑइल बदलताना ऑइल फिल्टर बदलणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
advertisement
4/6
रेडिएटर आणि कूलंटची भूमिका -  ट्रॅक्टर थंड ठेवण्याची सर्वात मोठी जबाबदारी रेडिएटरवर असते. रेडिएटरमधील शीतलक (कूलंट) योग्य प्रमाणात नसेल तर इंजिन पटकन गरम होते. त्यामुळे वेळोवेळी कूलंटची पातळी तपासणे आवश्यक आहे. जड काम करताना किंवा दीर्घकाळ ट्रॅक्टर चालवताना कूलंट तपासणे विशेष महत्त्वाचे ठरते.
advertisement
5/6
रेडिएटर स्वच्छ ठेवा - शेतीकामाच्या वेळी रेडिएटरमध्ये धूळ, माती आणि चिखल साचतो. यामुळे हवेचा प्रवाह अडतो आणि इंजिन नीट थंड होत नाही. म्हणून रेडिएटर नियमितपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे. तसेच रेडिएटरच्या होज पाईपमध्ये गळती आहे का? हे तपासावे. रेडिएटर व्यवस्थित असूनही पंखा नीट फिरत नसेल, तर इंजिन गरम होण्याची शक्यता असते. पंखा तुटलेला नाही, फॅन बेल्ट सैल किंवा झिजलेला नाही, याची खात्री करा. गरज असल्यास बेल्ट तात्काळ बदलावा.
advertisement
6/6
ट्रॅक्टरची क्षमता ओळखा -   सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टरची वस्तूला चलण्याची आणि ओढण्याची क्षमता समजून घेणे. क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेल्यास इंजिनवर अनावश्यक ताण येतो. उदाहरणार्थ, ट्रॅक्टरची उचलण्याची क्षमता १५०० किलो असताना सातत्याने २००० किलोपेक्षा जास्त वजन वाहिल्यास इंजिन गरम होईल आणि यांत्रिक भाग खराब होतील. त्यामुळे ट्रॅक्टर कधीही ओव्हरलोड करू नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
उन्हाळ्यामध्ये शेतात काम करत असतांना ट्रॅक्टर इंजिन जास्त गरम होत असल्यास काय करावं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल