TRENDING:

रश्मिकाआधी विजयच्या आयुष्यात आलेल्या या सुंदरी! Ex GF सोबत किसिंग करतानाचे फोटो झालेले व्हायरल, कोण आहेत त्या?

Last Updated:
Vijay Deverakonda Girlfriends: रश्मिकासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी विजयच्या आयुष्यात अनेक सुंदरी आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विजयची डेटिंग हिस्ट्री सुद्धा त्याच्या चित्रपटांप्रमाणेच टॉक ऑफ द टाऊन ठरलेली आहे.
advertisement
1/10
रश्मिकाआधी या सुंदरींच्या प्रेमात होता विजय?Ex GFसोबत किसिंग करतानाचे फोटो VIRAL
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' विजय देवरकोंडा अखेर बोहल्यावर चढणार आहे. 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना हिने 'विरोष' (VIROSH) या नावाने त्यांच्या लग्नाची घोषणा केली आणि सोशल मीडियावर अक्षरशः शुभेच्छांचा पूर आला.
advertisement
2/10
पण, रश्मिकासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी विजयच्या आयुष्यात अनेक सुंदरी आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कधी बेल्जियमची मैत्रीण तर कधी बॉलीवूडची बबली गर्ल... विजयची डेटिंग हिस्ट्री सुद्धा त्याच्या चित्रपटांप्रमाणेच टॉक ऑफ द टाऊन ठरलेली आहे.
advertisement
3/10
विजयच्या आयुष्यातलं पहिलं आणि सर्वात जास्त चर्चेत आलेलं नाव म्हणजे बेल्जियमची त्याची मैत्रीण वर्जिनी. सोशल मीडियावर विजय आणि वर्जिनीचे काही रोमँटिक फोटो व्हायरल झाले होते, ज्यात ते एकमेकांना किस करताना दिसत होते.
advertisement
4/10
सुरुवातीला फॅन्सना वाटलं की हे फोटो एडिटेड आहेत, पण नंतर इंस्टाग्रामवर त्यांच्या हँगआउटचे अनेक फोटो समोर आले. इतकंच काय, विजयने गुपचुप लग्न केल्याच्या अफवाही तेव्हा उठल्या होत्या. पण विजयने यावर कधीच अधिकृत भाष्य केलं नाही.
advertisement
5/10
विजय आणि सामंथा यांनी 'खुशी' चित्रपटात एकत्र काम केलं आणि पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री पाहून फॅन्स वेडे झाले. सामंथाचा घटस्फोट झाल्यानंतर विजय आणि ती एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्यांना उधाण आलं होतं.
advertisement
6/10
दोघांचेही बॉन्डिंग इतकं घट्ट होतं की सामंथा हीच विजयची रिअल लाईफ जोडीदार असल्याचं बोललं जाऊ लागलं. मात्र, नंतर दोघांनीही स्पष्ट केलं की, "आम्ही फक्त खूप चांगले मित्र आहोत आणि त्या पलीकडे काहीही नाही."
advertisement
7/10
जेव्हा विजयने 'लायगर' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं, तेव्हा त्याचं नाव अभिनेत्री अनन्या पांडेशी जोडलं गेलं. शूटिंग सुरू झाल्याच्या एका महिन्यातच दोघांमध्ये सूत जुळल्याच्या अफवा सुरू झाल्या.
advertisement
8/10
अनेक पार्ट्यांमध्ये आणि प्रमोशन दरम्यान हे दोघेही सावलीसारखे एकमेकांच्या सोबत असायचे. अनन्याने अनेकदा विजयचं उघडपणे कौतुकही केलं होतं. जरी त्यांनी हे नातं नाकारलं असलं तरी, त्यांच्यातील जवळीक काही वेगळंच सांगून जायची.
advertisement
9/10
विजय आणि रश्मिकाची जोडी 'गीता गोविंदम' पासूनच फॅन्सची फेव्हरेट बनली होती. २०१८ पासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. अनेकदा सुट्ट्या साजरी करण्यासाठी ते गुपचुप परदेशात जायचे.
advertisement
10/10
विमानतळावर वेगवेगळे दिसणारे विजय-रश्मिका सुट्ट्यांसाठी मात्र एकत्र असायचे, हे अनेकदा कॅमेऱ्यात कैद झालं. रक्षित शेट्टीसोबतचा साखरपुडा तुटल्यानंतर विजयने रश्मिकाला सावरलं आणि तिथूनच या खऱ्या प्रेमकथेला सुरुवात झाली, असं बोललं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रश्मिकाआधी विजयच्या आयुष्यात आलेल्या या सुंदरी! Ex GF सोबत किसिंग करतानाचे फोटो झालेले व्हायरल, कोण आहेत त्या?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल