Nashik Water: नाशिककरांनो पाणी जपून वापरा, ऐन उन्हाळ्यात व्हायची पंचाईत; धरणांमध्ये सध्याचा पाणीसाठा किती?
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
गेल्या वर्षी उशिरापर्यंत पडलेल्या पाऊसामुळे नाशिककरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये 72 टक्क्यांहून अधिकचा पाणीसाठा आहे. सध्याचा पाणीसाठा पाहता प्रशासनाकडून नाशिककरांना आत्तापासूनच पाण्याची बचत करण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
1/6

नाशिककरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा असला तरीही उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे. अद्याप तरी पाणी टंचाईचा मुद्दा फार धुसर असला तरीही नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना आत्तापासूनच पाणी जपून वापरण्यासाठी सांगितले आहे.
advertisement
2/6
नाशिक जिल्ह्यातला एकूण पाण्याचा साठा सध्या तरी 72 टक्क्यांवर आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यातील अनेक खेड्या पाड्यांतील आणि आदिवासी पाड्यांतील गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावतो. आता या दृष्टीनेच स्थानिक प्रशासनाकडून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा मुद्दा हाती घेण्यात आला आहे.
advertisement
3/6
नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण लहान मोठे 26 धरणं आहेत. या धरण क्षेत्रातील नागरिकांना पाण्याचा प्रश्न मार्च महिन्यापासून उद्भवण्यासाठी सुरू होतो. कारण, अनेक शेतकरी विहीर आणि शेततळे भरून आपल्या शेतीच्या वापरासाठी करत असतात. शिवाय, उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाला आत्ताच शेतकऱ्यांच्या पाणी टंचाईचा प्रश्न सोडवावा लागतो.
advertisement
4/6
शिवाय अनेक शेतकरी धरणांच्या माध्यमातून शेतीतला पाणीसाठा भरण्याचा प्रयत्न करतात. खेड्या पाड्यांतील आणि आदिवासी पाड्यांतील पाण्याचा प्रश्न जिल्हा प्रशासन सोडवताना दिसत आहे.सध्या तरी जिल्ह्यातल्या सर्व धरणांमध्ये 50 टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर आणि फार उशिरा पर्यंत पडल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा सर्व जिल्ह्याला झाला आहे.
advertisement
5/6
गंगापूर, काश्यपी, गौतमी, करंजवण, वाघाड, ओझरखेड, दारणा, भावली, मुकणे, कडवा आणि चणकापूर या सर्व धरणांमध्ये पाणीसाठी खूप उत्तम प्रमाणामध्ये आहे. 50 टक्क्यांहून अधिक पाणीसाठी या जिल्ह्यांमध्ये आहे. आत्तापासूनच योग्य प्रमाणामध्ये पाणी साठा करण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाने दिला आहे. उन्हाळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पाण्याचा वापर होत असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर करतात. पण सध्या प्रशासनाकडून नागरिकांना पाणी बचतीचा सल्ला दिला जात आहे.
advertisement
6/6
नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्प सुरू आहेत. त्या ठिकाणी सुद्धा या वेगवेगळ्या धरणांमधून पाण्याचा वापर केला जात आहे. पावसाळ्यापर्यंत पाण्याचा साठा योग्य पद्धतीने राहिल्यास सर्व प्रकल्पांना मुबलक प्रमाणामध्ये पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. कारण की, जर शेतीला आणि नागरिकांनाच जर पाण्याचा व्यवस्थित साठा उपलब्ध होत नसेल तर प्रशासनाला सहाजिकच पाणी कपात करणं हाच एक शेवटचा पर्याय असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Water: नाशिककरांनो पाणी जपून वापरा, ऐन उन्हाळ्यात व्हायची पंचाईत; धरणांमध्ये सध्याचा पाणीसाठा किती?