TRENDING:

Pune Fire Video: एकामागून एक 60 गाड्या पेटल्या! पुण्यात आगीचे रौद्र रूप, महागड्या कारसह दुचाकी खाक

Last Updated:

जळून गेलेल्या वाहनांमध्ये काही महागड्या चारचाकी गाड्यांचाही समावेश असल्याने नुकसान लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  पुण्यातील येरवडा परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. भूमी अभिलेख कार्यालयाजवळील एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या जवळपास 60 वाहनांना आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. यामध्ये 40 दुचाकी आणि 20 चारचाकी वाहनांचा समावेश असल्याची माहिती आहे. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
Pune Fire
Pune Fire
advertisement

समोर आलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरातील या मोकळ्या जागेत पोलिसांनी जप्त केलेली तसेच पार्किंगसाठी ठेवलेली मोठ्या प्रमाणावर वाहने उभी करण्यात आली होती. अचानकपणे या ठिकाणी आग लागल्याने काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले. एकामागोमाग एक वाहनांना आग लागत गेल्याने संपूर्ण परिसरात धुराचे दाट लोट पसरले होते. आगीची तीव्रता इतकी होती की काही अंतरावरूनही धुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते.

advertisement

बहुतांश वाहने पूर्णपणे जळून खाक

आगीची माहिती मिळताच येरवडा अग्निशमन केंद्रासह पुणे महापालिकेच्या विविध अग्निशमन दलांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तत्काळ पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत बहुतांश वाहने पूर्णपणे जळून खाक झाली होती.

advertisement

महागड्या चारचाकी गाड्यांचाही समावेश

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले असले तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. जळून गेलेल्या वाहनांमध्ये काही महागड्या चारचाकी गाड्यांचाही समावेश असल्याने नुकसान लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट, ज्वलनशील पदार्थ किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ही आग लागली असावी का, याबाबत तपास सुरू आहे. पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्यात येत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारेही तपास केला जात आहे.

advertisement

advertisement

परिसरात काही काळ तणावाचे वातावरण

या घटनेमुळे येरवडा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास सुरू असून या आगीमागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Tata ची टँकसारखी EV, Toyota च्या धाकड SUV ला देते टक्कर, रेंजमध्ये कोण बेस्ट?
सर्व पहा

मध्यरात्री स्फोटासारखे आवाज अन् घबराट! पोलिसांची धावपळ,अखेर गूढ उकललं; रत्नागिरीच्या समुद्रात नेमकं काय घडलं?

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Fire Video: एकामागून एक 60 गाड्या पेटल्या! पुण्यात आगीचे रौद्र रूप, महागड्या कारसह दुचाकी खाक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल