Farmer Success: नोकरी परवडेना, शिक्षकानं थेट राजीनामा दिला अन् शेत गाठलं, 65 दिवसांत मालामाल
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Agriculture Success: शिक्षक ढगे यांनी नोकरीचा राजीनामा देऊन एक एकर शेतीत प्रयोग सुरू केला. 65 दिवसांत लाखोंची कमाई केली.
advertisement
1/7

नोकरी मोठी की शेती? हा प्रश्न आजही ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना सतावतो. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील एका ध्येयवेड्या शिक्षकाने या प्रश्नाचे उत्तर केवळ शब्दात नाही, तर आपल्या कर्तृत्वातून दिले आहे.
advertisement
2/7
दयानंद चंद्रकांत ढगे यांनी शाळेतील शिक्षकाची नोकरी सोडून शेतात घाम गाळण्याचा निर्णय घेतला. अवघ्या 65 दिवसांच्या कालावधीत काकडीच्या पिकातून त्यांनी लाखो रुपयांची कमाई करून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.
advertisement
3/7
दयानंद ढगे हे एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र, वाढती महागाई आणि कुटुंबाच्या भविष्यातील गरजा पाहता, पगाराचे उत्पन्न त्यांना अपुरे वाटू लागले. केवळ चरितार्थ चालवण्यापेक्षा काहीतरी मोठे करण्याच्या जिद्दीतून त्यांनी नोकरीचा राजीनामा देण्याचा धाडसी निर्णय घेतला.
advertisement
4/7
आपल्या हक्काच्या मातीत 'सोनं' पिकवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी एका एकरात आधुनिक शेतीचा प्रयोग सुरू केला. ढगे यांनी काकडीच्या पिकासाठी जमिनीची योग्य मशागत करून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली.
advertisement
5/7
अवघ्या दोन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर त्यांच्या शेतात काकडीचे भरघोस पीक डोलू लागले. सध्या बाजारात काकडीला 22 ते 26 रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळत आहे. "शिक्षक म्हणून काम करताना काही मर्यादा होत्या, पण शेतीमध्ये मेहनतीला आणि नियोजनाला निश्चित फळ मिळते," असे मत ढगे यांनी व्यक्त केले.
advertisement
6/7
केवळ नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्यास, शेती हा खरोखरच नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न देणारा शाश्वत व्यवसाय ठरू शकतो, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
advertisement
7/7
दयानंद ढगे यांच्या या यशस्वी प्रयोगाचे मोहोळ तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कौतुक होत असून, सुशिक्षित बेरोजगारांसाठी ते एक प्रेरणास्थान ठरले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
Farmer Success: नोकरी परवडेना, शिक्षकानं थेट राजीनामा दिला अन् शेत गाठलं, 65 दिवसांत मालामाल