TRENDING:

Google Mapsवर कामी येतील या टिप्स! डेस्टिनेशनवर लवकर पोहोचवण्यास होईल मदत

Last Updated:
गूगल मॅप्सचा वापर करणं हे खुप सोपं आहे. स्मार्टफोन वापरणारे सर्वच या अॅपचा वापर करतात. एखाद्या नव्या शहरात गेल्यावर हे फीचर खुप कामी येते. आज आपण या फीचरविषयी महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत.
advertisement
1/6
Google Mapsवर कामी येतील या टिप्स! डेस्टिनेशनवर लवकर पोहोचवण्यास होईल मदत
ज्यावेळी आपण एखाद्या नव्या ठिकाणी जातो, किंवा मग नव्या शहरात जातो तेव्हा गुगल मॅप हे आपल्याला खुप उपयोगी पडते. निश्चित स्थळी जाण्यासाठी हे आपली खुप मदत करते.आता जास्तीत जास्त लोक हे रस्त्यांवरील लोकांना पत्ता विचारण्याऐवजी मॅप्स पाहून लगेच डेस्टिनेशनवर पोहोचतात.
advertisement
2/6
गूगल मॅप्स सर्वात शॉर्ट रुटने टोल आणि वातावरणाची माहिती देतो. आज आपण अशाच काही टिप्स पाहणार आहोत. ज्या यूज केल्याने गूगल मॅप आणखी फायदेशीर होईल आणि तुमचा प्रवासही सोपा होईल.
advertisement
3/6
घराबाहेर पडण्यापूर्वी ट्रॅफिक पाहा : तुमच्या शहरात वाहतूक कोंडी होत असेल, तर तुम्ही निघण्यापूर्वी तुमच्या मार्गावरील वाहतूक परिस्थिती तपासू शकता. हे करण्यासाठी, गुगल मॅप्स उघडा आणि ट्रॅफिक लेयर चालू करा. तुम्हाला लाल रंग दिसला तर याचा अर्थ वाहतूक कोंडी आहे; हिरवा रंग म्हणजे रस्ता मोकळा आहे.
advertisement
4/6
इनकॉग्निटो मोडही येईल कामी : तुम्ही इनकॉग्निटो मोडचा वापर करत असाल तर गूगल मॅप्स तुमची सर्च आणि रस्त्यांना अकाउं हिस्ट्रीमध्ये सेव्ह करणार नाही. हे टर्न ऑन करण्यासाठी प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा आणि इनकॉग्निटो मॉड ऑन करा.
advertisement
5/6
पिन ड्रॉप करण्यासाठी करा लॉन्ग प्रेस : तुम्हाला मॅपवर कोणत्याही लोकेशनला पिन करायची असेल ते सिलेक्ट करुन लॉन्ग प्रेस करा. येथुन तुम्ही ते लोकेशन शेयर किंवा सेव्ह करु शकता. एकदा लोकेशन पिन झाल्यावर नंतर तुम्हाला प्रत्येक वेळी त्याचा अॅड्रेस टाकावा लागणार नाही.
advertisement
6/6
ऑफलाइन मॅप: तुम्ही अशा मार्गांवर प्रवास करण्याचा विचार करत असाल जिथे मोबाइल नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या असू शकते, तर तुम्ही Google Maps ची ऑफलाइन व्हर्जन डाउनलोड करू शकता. या व्हर्जनला इंटरनेट अॅक्सेसची आवश्यकता नाही. ऑफलाइन नकाशे डाउनलोड करण्यासाठी, Maps उघडा आणि तुमच्या प्रोफाइल पिक्चरवर टॅप करा. तुम्हाला ऑफलाइन मॅप्स पर्याय दिसेल. येथून, तुम्ही तुम्हाला कव्हर करायचे असलेले क्षेत्र निवडू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Google Mapsवर कामी येतील या टिप्स! डेस्टिनेशनवर लवकर पोहोचवण्यास होईल मदत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल