TRENDING:

घरात भांडणाचं कारण बनतात 'या' गोष्टी, आजच करा चेंज; अन्यथा वाढतील सुखी संसारात अडचणी!

Last Updated:
अनेकदा मेहनतीने कमावलेला पैसा असूनही घरात शांती लाभत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरातील सदस्यांमध्ये मोठे वाद होतात आणि विनाकारण तणावाचे वातावरण निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घरातील ऊर्जेचा आपल्या मानसिक स्थितीवर खोलवर परिणाम होतो.
advertisement
1/7
घरात भांडणाचं कारण बनतात 'या' गोष्टी, आजच करा चेंज; अन्यथा वाढतील अडचणी!
अनेकदा मेहनतीने कमावलेला पैसा असूनही घरात शांती लाभत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरातील सदस्यांमध्ये मोठे वाद होतात आणि विनाकारण तणावाचे वातावरण निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घरातील ऊर्जेचा आपल्या मानसिक स्थितीवर खोलवर परिणाम होतो. जर तुमच्याही घरात सतत भांडणे होत असतील, तर त्याचे मुख्य कारण तुमच्या घरात असलेल्या काही चुकीच्या वस्तू असू शकतात.
advertisement
2/7
बंद पडलेली घड्याळे: घरातील बंद पडलेले घड्याळ हे प्रगती थांबल्याचे प्रतीक मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, बंद घड्याळ घरात नकारात्मकता पसरवते, ज्यामुळे घरातील सदस्यांच्या विचारांमध्ये अडथळे येतात आणि विनाकारण तणाव वाढतो. जर घड्याळ दुरुस्त होण्यासारखे नसेल, तर ते त्वरित घरातून बाहेर काढावे.
advertisement
3/7
बेडरूममधील आरसा: अनेकजण सजावटीसाठी बेडरूममध्ये मोठा आरसा लावतात, पण त्याचे स्थान चुकीचे असल्यास ते नात्यात दुरावा आणते. जर झोपताना तुमचे प्रतिबिंब आरशात दिसत असेल, तर ते अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होतात आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात. शक्य असल्यास आरसा बेडच्या समोरून हटवावा किंवा रात्री झोपताना तो कापडाने झाकून ठेवावा.
advertisement
4/7
मुख्य प्रवेशद्वारावर चपलांचा ढीग: घराचा मुख्य दरवाजा हा लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग मानला जातो. जर मुख्य दारासमोर चपला विखुरलेल्या असतील किंवा तिथे कचरा असेल, तर घरात येणारी सकारात्मक ऊर्जा थांबते. यामुळे घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आणि दरिद्रता वाढल्याने पैशावरून सतत भांडणे होतात.
advertisement
5/7
बेडखालील अडगळ आणि कचरा: काही लोक बेडखाली जुनी भांडी, चपला किंवा तुटलेल्या वस्तू साठवून ठेवतात. ही अडगळ मानसिक शांतता भंग करते आणि घरातील लोकांमध्ये चिडचिड वाढवते. बेडखालील जागा नेहमी स्वच्छ आणि मोकळी ठेवावी.
advertisement
6/7
नळातून पाणी टपकणे: वास्तूनुसार पाणी हे संपत्तीचे प्रतीक आहे. जर घरातील नळ गळत असेल किंवा पाणी टपकत असेल, तर ते धनहानीचे लक्षण आहे. ज्या घरात पाण्याचा अपव्यय होतो, तिथे आर्थिक चणचण भासते आणि पैशांच्या कमतरतेमुळे कुटुंबात क्लेश निर्माण होतात.
advertisement
7/7
घरात काटेरी झाडे लावणे: घरात किंवा खिडकीत निवडुंग किंवा इतर काटेरी झाडे लावणे टाळावे. काटेरी झाडे नकारात्मकता वाढवतात आणि नात्यात कटुता निर्माण करतात. त्याऐवजी तुळस किंवा मनीप्लांट यांसारखी शुभ झाडे लावावीत. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
घरात भांडणाचं कारण बनतात 'या' गोष्टी, आजच करा चेंज; अन्यथा वाढतील सुखी संसारात अडचणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल