TRENDING:

19 किमी मायलेज अन् Tata सारखी दणकट अशी SUV, किंमतही कमी!

Last Updated:
मार्च महिन्यामध्ये सर्वाधिक एसयूव्ही विक्रीचे आकडे समोर आले आहे. यामध्ये Skoda Kylaq ने सर्वाधिक विक्रीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे.
advertisement
1/7
19 किमी मायलेज अन् Tata सारखी दणकट अशी SUV, किंमतही कमी!
भारतात सध्या स्वस्तात मस्त अशा एसयूव्ही खरेदीचा ट्रेंड सुरू झाला आहे. भारतातील सगळ्याच कार उत्पादक कंपन्यांनी स्वस्तात एसयूव्ही उत्पादनाकडे कल वाढवला आहे. अशातच मार्च महिन्यामध्ये सर्वाधिक एसयूव्ही विक्रीचे आकडे समोर आले आहे. यामध्ये Skoda Kylaq ने सर्वाधिक विक्रीमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे.  Skoda Kylaq ही एक कमी किंमतीत सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग मिळवणारी एसयूव्ही ठरली आहे. मागील मार्च महिन्यात Skoda Kylaq च्या 4,670 युनिटची विक्री झाली आहे.
advertisement
2/7
Skoda Kylaq ही मागील वर्षी स्वस्तात मस्त अशी एसयूव्ही Skoda ने लाँच केली होती. Skoda Kylaq च्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर  बॉडी कलर्ड ORVMs, डोअर हँडल, ORVM आणि LED टर्न इंडिकेटर्स, LED हेडलाइट्स, LED DRLs, 16-इंच स्टील व्हिल्स आणि त्यावर व्हील कवर, ब्लॅक-आउट B पिलर आणि बरेच असे दमदार फिचर्स दिले आहे.
advertisement
3/7
Skoda Kylaq च्या इंटिरिअरबद्दल बोलायचं झालं तर हाईट अॅडजस्टेबल ड्राइव्हर सीट, टिल्ट आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग व्हिल अॅडजस्टसह अॅडजस्टेबल फ्रंट अँड रिअर हेडरेस्ट दिले आहे. Skoda Kylaq च्या इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि म्यॅनुअल एसी सुद्धा दिला आहे. 
advertisement
4/7
Skoda Kylaq मध्ये डिजिटल डिस्प्ले, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, लेदरेट अपहोल्स्ट्री, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, अँबियंट लायटिंग आणि कँटनची सिक्स स्पीकर साउंड सिस्टीम अशा प्रीमिअम फीचर्सचा समावेश आहे. सर्व व्हॅरिएंट्समध्ये सहा एअरबॅग्ज, ईबीडी, एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंटिंग पॉइंट्स, हेडरेस्ट आणि थ्री पॉइंट सीट बेल्ट देण्यात आले आहेत.
advertisement
5/7
Skoda Kylaq मध्ये  1.0 लिटरचं 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिलं आहे जे 114 bhp ची पिक पॉवर आणि 178Nm इतका पिक टॉर्क जनरेट करतो.  कारच्या इंजिन जे 6-स्पीड MT आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह दिलं आहे.  एक लिटर पेट्रोलमध्ये मॅन्युअल व्हर्जन 19.68 किलोमीटर्स मायलेज देते.
advertisement
6/7
सेफ्टीमध्ये या कारला  5-स्टार रेटिंग मिळाले आहे.  अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये स्कोडा कायलॅकने 32पैकी 30.88 गुण मिळवले. फ्रंटल ऑफसेट बॅरियर टेस्टमध्ये 16पैकी 15.035 गुण मिळाले. साइड मूव्हिंग डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये 16पैकी 15.840 गुण मिळाले आहेत.
advertisement
7/7
मार्केटमध्ये Skoda Kylaq चा मुकाबला हा थेट  टाटा नेक्सन, मारुती ब्रेजा, किआ सोनेट आणि महिंद्रा XUV 3XO या एसयूव्हीशी आहे.  भारतात Skoda Kylaq ची एक्स-शोरूम किंमत 7.59 लाख रुपयांपासून सुरू होते. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
19 किमी मायलेज अन् Tata सारखी दणकट अशी SUV, किंमतही कमी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल