Buttermilk : उन्हाळ्यात ताक म्हणजे अमृत; पण थांबा! 'या' परिस्थितीत ठरु शकतं विष, वेळीच व्हा सावध
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ताक प्रत्येकासाठीच फायदेशीर असतं का? जसं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तसंच ताकाचंही आहे. काहींसाठी अमृत ठरणारं हेच ताक, विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी मात्र त्रासदायक ठरू शकतं. तुम्हीही उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी ताकाचे शौकीन असाल, तर ताकाबद्दल तुम्हाला हे माहीत असायलाच हवं.
advertisement
1/9

मार्च महिना सरला की सूर्याचा पारा चढू लागतो. बाहेर पडलं की अंगाची लाहीलाही होते आणि गळा सुकायला लागतो. अशा वेळी फ्रिजमधलं थंडगार पाणी किंवा कोकाकोला पिण्यापेक्षा आपल्याला आठवण येते ती म्हणजे माठातल्या थंडगार ताकाची. कोथिंबीर, जिरं आणि सैंधव मीठ घातलेलं ताक म्हणजे उन्हाळ्यातील खरं सुख. त्यात जोडीला पुदीना असेल तर चव आणि पोट वाह वाहच करेल.....
advertisement
2/9
आयुर्वेदात तर ताकाला पृथ्वीवरचे अमृत म्हटले आहे. जेवणानंतर एक ग्लास ताक प्यायलं की पोट कसं शांत होतं. पण, ताक प्रत्येकासाठीच फायदेशीर असतं का? जसं प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तसंच ताकाचंही आहे. काहींसाठी अमृत ठरणारं हेच ताक, विशिष्ट आरोग्य समस्या असलेल्या लोकांसाठी मात्र त्रासदायक ठरू शकतं. तुम्हीही उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी ताकाचे शौकीन असाल, तर ताकाबद्दल तुम्हाला हे माहीत असायलाच हवं.
advertisement
3/9
कोणी ताक पिणं टाळावं?सर्दी, खोकला आणि दमाज्यांना वारंवार सर्दी होते, सायनसचा त्रास आहे किंवा अस्थमा आहे, त्यांनी ताक पिणे टाळावे. ताकामुळे शरीरात 'कफ' वाढू शकतो, ज्यामुळे घसा खवखवणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
advertisement
4/9
पचनशक्ती आणि डेअरी ॲलर्जीज्यांना दुग्धजन्य पदार्थ (Dairy Products) पचत नाहीत, त्यांना ताक प्यायल्याने जुलाब, गॅस किंवा पोट फुगल्यासारखे वाटू शकते.
advertisement
5/9
किडनीचे आजारकिडनीचा त्रास असलेल्या रुग्णांनी ताकातील खनिजांच्या प्रमाणाबाबत सतर्क राहिले पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त ताक प्यायल्यास किडनीवर विनाकारण ताण येऊ शकतो.
advertisement
6/9
ॲसिडिटी आणि अल्सरताक पोटाला थंडावा देतं हे खरं असलं, तरी ज्यांना गंभीर ॲसिडिटी किंवा अल्सरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी ताकाचा आंबटपणा जळजळ वाढवू शकतो.
advertisement
7/9
ताक कधी प्यावे, याचेही काही नियम आहेत जे पाळल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात:1. दुपारची वेळ सर्वोत्तम: ताक पिण्यासाठी दुपारची वेळ ही सर्वात उत्तम मानली जाते. यामुळे पचनक्रिया सुधारते.2. रात्री ताक पिणे टाळा: रात्रीच्या वेळी ताक पिणे पूर्णपणे टाळावे. यामुळे पचन मंदावते आणि काही जणांना जुलाबही होऊ शकतात.3. अति आंबट ताक नको: जास्त आंबट झालेले ताक शरीरातील 'पित्त' वाढवते. त्यामुळे नेहमी ताजे किंवा मध्यम आंबट ताकच वापरावे.
advertisement
8/9
ताकाची शक्ती कशी वाढवाल?नुसतं ताक पिण्यापेक्षा त्यात काही घरगुती पदार्थ मिसळल्यास ते आरोग्यासाठी अधिक गुणकारी ठरते. ताकात 1 चमचा हळद, थोडे जिरे, कढीपत्ता आणि आले किसून घाला. यामुळे गॅसचा त्रास कमी होतो आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होते.ताक हे अमृतासमान आहे यात शंका नाही, पण ते तुमच्या प्रकृतीला मानवते का, हे तपासूनच त्याचा आनंद घ्या. उन्हाळ्याचा आनंद घेताना आरोग्याची छोटीशी काळजी तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवू शकते.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Buttermilk : उन्हाळ्यात ताक म्हणजे अमृत; पण थांबा! 'या' परिस्थितीत ठरु शकतं विष, वेळीच व्हा सावध