TRENDING:

SUV अशी की फॅक्टरीतून निघण्याआधीच मिळता 5 स्टार सेफ्टी रेटिंग, आता पुण्यात झाली तयार!

Last Updated:
आता Volkswagen Taigun च्या फेसलिफ्ट मॉडेल लाँचची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील प्लांटमध्ये या एसयूव्हीचं उत्पादन सुद्धा सुरू झालं आहे. नवीन Taigun चं मॉडेल हे ९ एप्रिल रोजी लाँच होणार आहे. 
advertisement
1/7
 SUV अशी की फॅक्टरीतून निघण्याआधीच मिळता 5 स्टार सेफ्टी रेटिंग, आता पुण्यात झाली तयार!
जर्मन कार उत्पादक कंपनी Volkswagen India ने मागील काही वर्षांपासून भारतात एसयूव्ही सेगमेंटमध्ये एकापेक्षा एक दमदार SUV लाँच करून मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.  अलीकडेच Volkswagen  आपली Taigun ही एसयूव्ही लाँच केली होती. आता Volkswagen Taigun च्या फेसलिफ्ट मॉडेल लाँचची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील प्लांटमध्ये या एसयूव्हीचं उत्पादन सुद्धा सुरू झालं आहे. नवीन Taigun चं मॉडेल हे ९ एप्रिल रोजी लाँच होणार आहे.
advertisement
2/7
Volkswagen Taigun चं हे फेसलिफ्ट मॉडेल हे २०२१ नंतर येत आहे.  डिझाईनमध्ये बरेच बदल केले आहे. यामध्ये  स्लीकर आणि रिशेप्ड एलईडी हेडलॅप्स दिले आहे. जे  कनेक्टेड डे-टाइम रनिंग लाइट्स  डीआरएलसह येतात. समोर बंपर आणि ग्रिल जास्त आक्रमक आहे.  त्यामुळे एसयूव्हीला आक्रमक असा लूक आला आहे.
advertisement
3/7
Volkswagen Taigun च्या इंटिरियरमध्येही बरेच बदल केले आहे. यामध्ये आता नवीन 10.25 इंचाचाडिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिलं जाणार आहे. फिचर्समध्ये वायरलेस चार्जिंग, अपडेटेड इंफोटेनमेंट सिस्टम, अॅडवांस्ड सेफ्टी फिचर्स आणि  क्रूज कंट्रोल आणि ६ एअरबॅग्स दिले जाणार आहे.
advertisement
4/7
'नव्या Volkswagen Taigun चे उत्पादन सुरू होणे हे भारतातील आमच्या जागतिक दर्जाच्या उत्पादन व्यवस्थेच्या परिपक्वतेचे प्रतीक आहे. भारतीय उत्पादन केंद्रे जागतिक दर्जाची वाहनं उच्च लोकलायझेशनसह तयार करण्यास सक्षम आहेत. ज्यामुळे आम्ही भारतातील तसेच निर्यात बाजारातील ग्राहकांच्या मागण्या त्वरित पूर्ण करू शकतो.  नव्या टायगनचे उत्पादन सुरू करताना आम्ही भारताला ग्रुपसाठी एक महत्त्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून अधिक मजबूत करत आहोत.” अशी माहिती स्कोडा ऑटो फॉक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ पियूष अरोरा यांनी दिली.
advertisement
5/7
विशेष म्हणजे,  Volkswagen Taigun ची आतापर्यंत भारतात १,४३,००० हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. जवळपास  ३० टक्के गाड्यांची निर्यात केली आहे. आता नव्या Taigun चे उत्पादन सुरू झाल्यामुळे व्हॉल्क्सवॅगनच्या एसयूव्ही पोर्टफोलिओला आणखी बळ मिळणार आहे. पुण्यातील चाकण प्लांटमध्ये नव्या टायगनचे उत्पादन सुरू झाले आहे, आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, अशी माहिती  फॉक्सवॅगन इंडियाचे ब्रँड डायरेक्टर नितीन कोहली यांनी दिली.  
advertisement
6/7
Volkswagen Taigun ची किंमत किती असणार याबद्दल बरीच चर्चा आहे. पण ही एसयूव्ही आता मेड इन इंडिया म्हणून पुण्यात तयार केली आहे. त्यामुळे किंमतीत बदल होणार आहे. अंदाजे या Volkswagen Taigun ची किंमत ही  12 लाख ते 21 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे.
advertisement
7/7
Volkswagen Taigun ची मार्केटमध्ये थेट  Hyundai Creta, Kia Seltos, Toyota Urban Cruiser Hyryder आणि Skoda Kushaq सारख्या गाड्यांशी मुकाबला होणार आहे.  आता ही एसयूव्ही 9 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
SUV अशी की फॅक्टरीतून निघण्याआधीच मिळता 5 स्टार सेफ्टी रेटिंग, आता पुण्यात झाली तयार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल