TRENDING:

Bigg Boss फेम अभिनेत्रीच्या गर्भधारणेत अडचणी? घेतला मोठा निर्णय, म्हणते 'मी आई होऊ शकले नाही, तर...'

Last Updated:

नुकतंच एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील भावनिक गोष्टीचा खुलासा केला असून यानंतर तिने एक मोठा निर्णय घेतला आहे. चाहत्यांना या बातमीनंतर मोठा धक्काच बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: गोविंदाची भाची आणि बिग बॉस १३ फेम अभिनेत्री आरती सिंह सध्या एका धक्कादायक गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. आरतीने नुकतंच एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील भावनिक गोष्टीचा खुलासा केला असून यानंतर तिने एक मोठा निर्णय घेतला आहे. चाहत्यांना या बातमीनंतर मोठा धक्काच बसला आहे. आरती सिंह व्यावसायिक दीपक चौहानसोबत विवाहबंधनात अडकली. पण लग्नानंतर वयाच्या ४१ व्या वर्षी मातृत्वाचा विचार करताना आरतीने आपल्या भूतकाळातील अशा काही जखमा उघड्या केल्या आहेत, ज्या ऐकून कोणाचेही डोळे ओलावतील. नुकतंच एका मुलाखतीत तिने अनेक खुलासे केले आहेत.
News18
News18
advertisement

मातृत्वाबद्दल आरती सिंहचा मोठा निर्णय

आरतीचा जन्म ५ एप्रिल रोजी झाला, पण ती अवघ्या दीड महिन्याची असताना ११ मे रोजी तिच्या आईचं निधन झालं. आईच्या निधनानंतर आरती आणि तिचा भाऊ कृष्णा अभिषेक यांची ताटातूट झाली. आरतीला तिच्या आईच्या जवळच्या नातेवाईकांनी दत्तक घेतलं आणि तिचं संगोपन केलं. आईवडील नसताना या कुटुंबाने जे प्रेम दिलं, त्यामुळेच आरती आज इथवर पोहोचली आहे. आता आरती ४१ वर्षांची असून वाढत्या वयामुळे होणाऱ्या समस्यांबाबत अनेक महिलांनी तिच्या मनात भीती घातली आहे. अशातच आरतीने याबाबत दिलेली प्रतिक्रिया अनेकांचं मन जिंकतेय.

advertisement

आरती म्हणते, "जर मला नैसर्गिकरित्या आई होता आलं नाही, तर मी नक्कीच मूल दत्तक घेईन. मला कोणाला काहीही सिद्ध करायचं नाहीये. ज्याप्रमाणे मला दुसऱ्या कुटुंबाने दत्तक घेऊन आयुष्य दिलं, तसंच मलाही एखाद्या निरागस जीवाला घर द्यायला आवडेल."

आरतीच्या निर्णयाला पतीचा खंबीर पाठिंबा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

विशेष म्हणजे, आरतीच्या या निर्णयाला तिचा पती दीपकने पूर्ण पाठिंबा दिला आहे. लग्नाआधीच आरतीने त्याला आपल्या वयाबद्दल आणि मुलांबद्दल स्पष्ट कल्पना दिली होती. त्यावर दीपकने दिलेलं उत्तर काळजाला भिडणारं होतं. दीपक म्हणाला, "जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांना घराची गरज आहे. आपल्याला स्वतःचं मूल झालं तरी आपण एक मूल दत्तक घेऊया."

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss फेम अभिनेत्रीच्या गर्भधारणेत अडचणी? घेतला मोठा निर्णय, म्हणते 'मी आई होऊ शकले नाही, तर...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल