TRENDING:

Vaibhav Suryavanshi : सूर्यवंशीने बुमराहला सिक्स मारल्यानंतर हार्दिक भडकला, त्याला सगळ्यांसमोर सुनावलं, मैदानात मोठा ड्रामा

Last Updated:

राजस्थान रॉयल्सने 150 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर 151 धावांचे लक्ष्य आहे.या सामन्यात हार्दिक पांड्या प्रचंड भडकला आहे.त्यामुळे मैदानात नेमका काय राडा झाला आहे?हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Vaibhav Suryavanshi vs Jasprit Bumrah : आयपीएलमध्ये पावसामुळे रद्द व्हायला आलेला मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना 11 ओव्हरमध्ये पार पडला आहे. यामध्ये जयस्वालच्या 32 बॉलमध्ये 77 धावांच्या नाबाद खेळीच्या आणि वैभव सूर्यवंशी 14 बॉलमध्ये 39 धावांच्या बळावर राजस्थान रॉयल्सने 150 धावा ठोकल्या होत्या.त्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर 151 धावांचे लक्ष्य आहे.या सामन्यात हार्दिक पांड्या प्रचंड भडकला आहे.त्यामुळे मैदानात नेमका काय राडा झाला आहे?हे जाणून घेऊयात.
News18
News18
advertisement

हार्दिक पांड्याने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे राजस्थान रॉयल्स प्रथम फलंदाजीला होती. यावेळी जयस्वालने पहिल्याच बॉलपासून प्रहार करायला सूरूवात केली होती. यावेळी जयस्वालने दीपक चहरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडत 22 धावा काढल्या होत्या.

त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला बुमराह आणि वैभव सूर्यवंशीचा आमना सामना झाला.ज्यामध्ये वैभवने पहिल्याच बॉलला बुमराहला सिक्स मारलात.त्यानंतर त्याने बुमराहचा आदर ठेव एक धाव काढली.त्यानंतर पुन्हा फलंदाजीला आल्यावर आणखी एक सिक्स मारला.अशाप्रकारे वैभवने बुमराहच्या ओव्हरला 13 धावा काढल्या.

advertisement

पण बुमराहच्या पाचव्या बॉलला मोठा ड्रामा झाला. त्याचं झालं असं की बुमराहने वैभवला फुट टॉस टाकला. पण बॉल त्याच्या पॅडला लागला आणि विकेटमागे गेला. त्यामुळे वैभव रन काढायला धावला. पण त्याने मागे खेळाडू पाहिलाच नाही. मागच्या खेळाडुने स्टम्पवर बॉल मारला पण तो लागलाच नाही, नाहीतर वैभव सू्र्यवंशी रनआऊट झाला. त्यावेळेस हार्दिक पांड्या रायन रिकल्टनवर भडकला. कारण रनआऊटसाठी त्याने स्टम्पजवळ जाणे अपेक्षित होते. पण तो गेलाच नाही आणि मागेच उभा राहिला,त्यामुळे रनआऊट मिस झाला. जर हा रनआऊट मुंबईने घेतला तर धावांमध्ये थोडाफार नक्कीच फरक असता.

advertisement

यशस्वी जयस्वालने आक्रामक खेळी करत ट्रेंट बोल्टला दोन बॉल दोन सिक्स ठोकले. त्याच्यासोबत वैभवने देखील त्याला सिक्स मारला. हार्दिक पांड्याच्या ओव्हरला दोघांची बॅट शांत राहिली. त्यानंतर वैभवने शार्दुल ठाकूरला पहिल्या बॉलला सिक्स मारला. त्यानतर त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलला तो सिक्स मारताना बाद झाला.

या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 14 बॉलमध्ये 39 धावा केल्या. त्याच्यानंतर ध्रुव जुरेल 2 वर बाद झाला.त्यानंतर रियान पराग 20 वर बाद झाला. राजस्थानकडून सर्वाधिक धावा या यशस्वी जयस्वालने केल्या. जयस्वालने 32 बॉलमध्ये 77 धावांची नाबाद खेळी केली. या बळावर राजस्थानने 11 ओव्हरमध्ये 150 धावा केल्या. त्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर 151 धावांचे आव्हान असणार आहे.

advertisement

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूला मिळाला उच्चांकी दर, कांद्याने आणले शेतकऱ्यांचा डोळ्यात पाणी, केळीचा आजचा भाव काय? Video
सर्व पहा

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकिपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, एएम गझनफर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : सूर्यवंशीने बुमराहला सिक्स मारल्यानंतर हार्दिक भडकला, त्याला सगळ्यांसमोर सुनावलं, मैदानात मोठा ड्रामा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल