IPL 2026 : मुंबईचा राजस्थानसमोर 'डिझास्टर', 5 घोडचुकांनी केली सगळी पोलखोल!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 मध्ये राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सना पराभवाचा धक्का लागला आहे. राजस्थानने दिलेल्या 151 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची बॅटिंग गडगडली.
advertisement
1/8

राजस्थानने दिलेल्या 151 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 123/9 पर्यंतच मजल मारता आली, त्यामुळे त्यांचा 27 रननी पराभव झाला आहे. केकेआरविरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबईने पुढचे दोन्ही सामने गमावले आहेत.
advertisement
2/8
पावसामुळे हा सामना 11-11 ओव्हरचा खेळवला गेला, ज्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. खरंतर कमी ओव्हरच्या सामन्यांमध्ये आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या टीमचा फायदा होतो, पण टॉस जिंकल्यानंतरही मुंबईने घोडचुका केल्या, ज्याचा फटका त्यांना बसला.
advertisement
3/8
ट्रेन्ट बोल्ट हा टी-20 फॉरमॅटच्या पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरपैकी एक आहे, पण मुंबईने बोल्टला पहिली ओव्हर न देता दीपक चहरच्या हातात बॉल दिला. चहरने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 22 रन दिल्या ज्यामुळे राजस्थानला धमाकेदार सुरूवात मिळाली.
advertisement
4/8
मुंबई इंडियन्सने या सामन्यात बोल्टला फक्त एकच ओव्हर दिली, ज्यात त्याने 22 रन दिल्या. बोल्ट हा पहिल्या ओव्हरमध्ये बॉल स्विंग करण्यासाठी ओळखला जातो, पण मुंबईने त्याला थेट तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग दिली, जिथे त्याचा बॉल स्विंग झाला नाही आणि वैभव सूर्यवंशी-जयस्वालने त्याच्यावर आक्रमण केलं.
advertisement
5/8
शार्दुल ठाकूर हा त्याच्या डेथ ओव्हर बॉलिंगसाठी ओळखला जात नाही, पण तरीही मुंबईने शार्दुलला शेवटची ओव्हर टाकायला दिली, ज्यात त्याने 18 रन दिल्या. डेथ ओव्हरमध्ये बोल्ट यॉर्कर टाकू शकतो हे त्याने अनेकदा दाखवून दिलं आहे, पण तरीही मुंबईने त्याला बॉलिंग दिली नाही.
advertisement
6/8
आयपीएलच्या इतर टीमचे ओपनर पॉवर प्लेमध्ये 200 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने खेळत असताना मुंबईचा ओपनर रियान रिकलटन लागोपाठ दुसऱ्या सामन्यात संघर्ष करताना दिसला. 4 बॉलमध्ये 8 रन करून रिकलटन आऊट झाला.
advertisement
7/8
रोहित शर्मा हा संदीप शर्माच्या समोर पुन्हा एकदा अपयशी ठरला. रोहितने आयपीएल इतिहासात संदीप शर्माविरुद्ध 47 बॉल खेळले ज्यात त्याने 80.85 चा स्ट्राईक रेटन आणि फक्त 6.33 च्या सरासरीने 38 रन केले, ज्यात 30 डॉट बॉल होते.
advertisement
8/8
फक्त ओपनरच नाही तर मुंबईच्या मिडल ऑर्डरलाही या सामन्यात संघर्ष करावा लागला. सूर्यकुमार यादव 3 बॉल 6 आणि तिलक वर्मा 10 बॉल 14 रन करून आऊट झाले. फक्त बॉलिंगच नाही तर बॅटिंगच्या अपयशामुळेही मुंबईला लागोपाठ दुसऱ्या पराभवाचा धक्का बसला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : मुंबईचा राजस्थानसमोर 'डिझास्टर', 5 घोडचुकांनी केली सगळी पोलखोल!